Gateway Mandwa ferry service Close Pudhari
गोवा

Goa Inland Waterways | राज्यात अंतर्गत जलवाहतुकीसाठी 10 जेटी

Goa Inland Waterways | हळदोणा, रायबंदर ते जुने गोवे! राज्यात १० ठिकाणी उभारल्या जाणार आधुनिक काँक्रीट जेटी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या अंतर्गत जलवाहतुकीला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये कुंभारजुवे कालवा, मांडवी नदी आणि जुआरी नदीवर १० जेटींच्या बांधकामाचा समावेश आहे, अशी माहिती बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिली.

१० काँक्रीट जेटी सरासरी २४ मीटर x ६ मीटर आकाराच्या असून, सध्याच्या प्रगतीमध्ये सर्व जेटींचे कास्टिंग पूर्ण करणे, तीन जेटींचे काम अंतिम टप्प्यात असून त्या बसवण्यासाठी तयार आहेत, यांचा समावेश आहे.

मंत्रालयाने जेटी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी डिसेंबर २०२६ ची कालमर्यादा दिली आहे. हा प्रकल्प सागरमाला योजनेअंतर्गत असून, आगामी जेटी हळदोणा, रायबंदर, जुने गोवे, पिळगाव, बाणस्तारी आणि सावर्डे येथे उभारण्यात येणार आहेत.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रस्ते क्षेत्रात मांडवी नदीवर एकूण ९.६ कोटी रुपये खर्चाचे चार तरंगते काँक्रीट टर्मिनल आहेत. हे टर्मिनल म्हणजे पणजी, जुने गोवे, शापोरा आणि कांपाल येथील तरंगती जेटी असून, येथे लहान क्रूझ बोटी इत्यादींची हाताळणी केली जाते. राज्यातील पूर्ण झालेले चार जेटी टर्मिनल हे देशाच्या राष्ट्रीय जलमार्गावर टर्मिनलच्या बांधकामासाठी गुंतवलेल्या २८.७ कोटी रुपयांचा भाग आहेत.
उपक्रमांमध्ये मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट टर्मिनल्स, इंटरमोडल टर्मिनल, जेटी आणि जलमार्गांची देखभाल यांचा समावेश आहे. हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे जलमार्गामार्फत व्यापार आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होते, असे त्यात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT