पणजी : पुढारी वृत्तसेवा
दोन आएएस व एक आयपीएस अधिकारी मिळून गोव्यातील तिघांची गोव्यात पुन्हा बदली झाली आहे. शिरगाव जत्रोत्साव चेंगराचेंगरीच्या प्रकरणी पडद्याआड झालेले गोव्यातील आयपीएस अधिकारी अक्षत कौशल यांची बदली झाली असून त्याजागी अरुणाचल प्रदेशच्या आयपीएस श्रुती अरोरा यांची बदली झाली आहे.
आयएएस अधिकारी संजीव अहुजा व अंकिता मिश्रा यांची अनुक्रमे दिल्ली व अरुणाचल प्रदेशमध्ये बदली झाली आहे. लडाख येथे असलेले आयएएस मायकल डिसोझा, दमण दिव येथील निखिल देसाई तसेच अरुणाचल प्रदेशमधील आयपीएस शेखर प्रभुदेसाई यांची गोव्यात बदली झाली आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात शिरगाव लईराई देवीच्या जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहाजणांचा मृत्यू झाल्याने तत्कालिन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांना पदावरून हटवण्यात आले होते व त्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. या शिरगाव प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारकडे तीन महिन्यापूर्वी पोहचला आहे मात्र या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध अजूनही कारवाई झालेली नाही त्यापूर्वी अधीक्षक अक्षत कौशल (आयपीएस) यांची बदली झाल्याची चर्चा झाली आहे.