Casinos  file photo
गोवा

Mandavi River Casino | मांडवी नदीत नवीन कॅसिनो जहाजाला 'ब्रेक'! हायकोर्टाचा 6 जुलैपर्यंत 'जैसे थे' परिस्थितीचा आदेश

Mandavi River Casino | इनफ इज इनफ संस्थेकडून सादर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मांडवी नदीत कोणतेही नवे कॅसिनो जहाज आणण्यासाठी तसेच विद्यमान परवान्यांच्या हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी घेणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बंधनकारक करून ६ जुलैपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कॅसिनो कंपनी या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने इनफ इज इनफ याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही स्थगिती आदेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

डेल्टीन कंपनीचे महाकाय कॅसिनो जहाज मुरगाव बंदर पोहचून ते नांगरून ठेवण्यात आले आहे. या जहाजाविरोधात उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ते गोव्याच्या अरबी समुद्रात आणले गेले असल्याची माहिती याचिकादारांनी दिली.

त्यामुळे गोवा खंडपीठाने संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय हे कसिनो जहाज मांडवी नदीच्या पात्रात आणले जाणार नाही, असे आश्वासन कंपनीच्या वकिलांनी दिले.

त्यामुळे हे कॅसिनो जहाज पुढील सुनावणीपर्यंत मुरगाव बंदरातच ठेवले जाणार आहे. हे महाकाय कॅसिनो जहाज मांडवी नदीच्या पात्रात विरोध होत असून ते गोव्याच्या समुद्रात आणण्यास विरोध नाही. त्यामुळे ते आणून मुरगाव बंदरात ठेवले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT