गोवा

Goa PSI recruitment case: उपनिरीक्षक भरती आव्हान याचिकेवर खंडपीठाचा निर्णय

ही भरती प्रक्रियाच चुकीची असल्याने ती रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पोलिस खात्यात सुरू असलेल्या पोलिस उपनिरीक्षक भरतीला आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली. त्यावरील निर्णय (२१ जानेवारी) राखून ठेवण्यात आला आहे. साई मोहन नाईक, महाबळेश्वर हरमलकर, सचिन पवार, सागर वेळीप, पांडुरंग बांदेकर, दत्तराज तारी यानी ही याचिका सादर केली आहे. ही भरती प्रक्रियाच चुकीची असल्याने ती रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.

नोकरभरतीसाठी १०० मीटर व ८०० मीटर धावण्याची चाचणी घेताना उमेदवारांना दोन लेनमध्ये उभे करण्यात आले होते. त्यांच्या पायाला आरएफडी ही वेळ नोंदवणारे चीफ बसवण्यात आली होती. धावताना याचिकादारांना वेग पकडता आला नसल्याने त्यांना अपात्र होण्याची पाळी आली असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. वाल्मिकी मिनेझिस यांनी मांडली.

अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ही शारीरिक चाचणी सीसी टीव्ही कॅमेरामध्ये घेण्यात आली. त्याचा व्हिडिओ त्यांनी खंडपीठाला सादर केला. धावताना उमेदवारांना ओव्हरटेक करताना काहीच अडथळा आलेले नाहीत हे स्पष्टपणे व्हिडिओमधून दिसून येते असे न्यायालयाला सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT