आरोग्यमंत्री विश्वजित रा़णे, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.  Pudhari News Network
गोवा

आरोग्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी: गोमेकॉतील निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे

Goa Doctors Protest | विशेष महिला डॉक्टरची नियुक्ती करू

पुढारी वृत्तसेवा

पणजी: पुढारी वृत्तसेवा: डॉक्टर, महिला आणि मुलींची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. महिला डॉक्टरांच्या समस्या मांडण्यासाठी विशेष महिला डॉक्टरची नियुक्ती करू. कोणत्याही विभागातील गैरव्यवहार खपवून घेणार नाही. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिले. (Goa Doctors Protest)

लिखित आश्वासनानंतर निवासी डॉक्टरांचे आंदोलन मागे

कोलकाता येथे डॉक्टरवरील बलात्कार व खून घटनेच्या पार्श्वभूमीवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना सुरक्षा मिळावी, या मागणीसाठी गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री राणे यांनी गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. आरोग्यमंत्री राणे यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते. (Goa Doctors Protest)

विविध मागण्या केल्या

गोमेकॉतील सर्व डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत उपाय योजावेत, सीसीटीव्ही लावले जावेत, रात्रीच्या प्रवास करणार्‍या डॉक्टरांना वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी, सुरक्षितता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच कामाचे वातावरण सुरक्षित निर्माण करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. (Goa Doctors Protest)

समस्यांचे निराकरण करण्यासाठी वचनबद्ध

मंत्री राणे म्हणाले की, डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहे. महिला डॉक्टरांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय केले जातील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्यासाठी सहकार्य करतील. कोलकाता येथे काय घडले आहे, याबद्दल बोलणे आवश्यक आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री डॉक्टरांच्या समस्येकडे का लक्ष देत नाहीत? प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीकोनातून का पाहिले जाते? असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले. (Goa Doctors Protest)

डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. केवळ गोमेकॉतील नव्हे, तर राज्यभरातील डॉक्टरांच्या सर्व मागण्या सोडविण्यात येतील, असेही मंत्री राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT