Morjim Lawyer Assault Case 
गोवा

Morjim Advocate Attack | मोरजी हल्ला प्रकरण क्राईम ब्रँचच्या पोलिस अधीक्षकांकडे वर्ग

Morjim Advocate Attack | पोलिस तपासातील हलगर्जीपणाची चौकशी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मोरजी येथील अनधिकृत बांधकाम पाडकामावेळी वकील अंकुर कुमार व त्याचे अशील यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांकडून झालेल्या कथित हलगर्जीपणाची खात्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी गोवा सरकारने गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांची नियुक्ती केली आहे.

अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेल्याचा अनुपालन अहवाल, तसेच हल्ला प्रकरणी पोलिस तपासाचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश देत ही सुनावणी येत्या बुधवारी २९ जुलैला ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मांद्रे पोलिसांकडून काढून तो कोलवाळ पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे.

या हल्ला प्रकरणी न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन सुनावणी सुरू केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी ही माहिती देण्यात आली.

या चौकशीत उच्च न्यायालयाने पाडकामावेळी सुरक्षा पुरविण्याबाबत दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात झालेल्या त्रुटी, तसेच हल्ल्यानंतरच्या तपासातील कमतरतांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, विभागीय चौकशीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे, पेडणे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील डिस्पॅच डायरीसह इतर नोंदी, जप्त करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT