पणजी : पुढारी वृत्तसेवा
वर्षभरात राज्यात १४१०.८७कोर्टीचे ५९ प्रकल्प उभारण्यात आले असून १, २४८ कोर्टीच्या १५ प्रकल्पांचे काम सुरू आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या काळात गोवा सरकारने भरीव कामगिरी करताना 'म्हजें घर' सारख्या योजनेतून लोकांची घरे नियमित करण्याचा कायदा केला.
राज्यातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात असून गुन्हे तपासणी दर ८७.७२ टक्के आहे. सर्वच क्षेत्रात सरकारने प्रगती व लोकांचे जीवनमान सुसह्य केले, अशा शब्दांत राज्यपालांकडून अभिभाषणाद्वारे वर्षभराच्या सरकारच्या कामाचा आढावा घेण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियमानुसार, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आपल्या अभिभाषणात गेल्या वर्षभरामध्ये राज्य सरकारने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच, उभे राहिलेले प्रकल्प आणि विविध योजनांसाठी झालेला खर्च याबाबत सविस्तरपणे माहिती दिली.
राज्यपाल म्हणाले, सरकारने तिसरा जिल्हा कुशावती स्थापन करून ग्रामीण भागातील लोकांना प्रशासन जवळ देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा स्थापन केल्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. राज्याचा नकाशा कोकणीमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध केला आहे. गोकर्ण मठाच्या हल्लीच झालेल्या ५५० व्या स्थापना दिवस सोहळ्यामुळे व तेथे उभारलेल्या श्रीरामाच्या भव्य पुतळ्यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
गोवा शिपयार्डतर्फे किनारी सुरक्षेसाठी समुद्र प्रताप हे जहाज स्वदेशी जहाज बांधून स्वदेशीला प्रेरणा दिली. 'म्हजें घर' योजनेद्वारे गोव्यातील लाखो घरे नियमित करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले असून या योजनेतून ९५ टक्के गोमंतकीयांची घरे नियमित होतील.
कायदा दुरुस्ती करण्यात आल्यामुळे सरकारी जागेतील व कोमुनिदाद जागेतील २०१४ पूर्वीची घरे कायदेशीर होणार आहेत. वंदे मातरम्ला झालेली १५० वर्षे त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जनतेने पुन्हा निवडून देऊन सरकारचे काम चांगले चालत असल्याचा पुरावा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टमुळे गोव्याचे नाव जगभर पोहोचले. स्वातंत्र्य सैनिक लिविया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.
गायक अजितकुमार कडकडे यांना गोमंत विभूषण पुरस्कार देण्यात आला. इफ्फीचे आयोजन सुरळीतपणे झाले. दोनापावला येथे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. विकसित गोवा २०३७ व विकसित भारत २०४७ चे ध्येय साध्य करण्यासाठी स्वयंपूर्ण गोवासारख्या योजनेसह राज्य व केंद्राच्या
१,७२१ कोटींचे नवे प्रकल्प कदंब पठारावर
प्रशासन स्तंभ व वास्को बसस्थानक बांधले जाईल, त्यासोबतच जुन्ता हाऊस, सरकारी गॅरेज व सांतिनेज सरकारी वसाहत इमारती पाडून नव्या बांधल्या जातील. या प्रकल्पांवर १,७२१ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्याच सोबत पीपीपी तत्त्वावर दोनापावला येथे जागतिक दर्जाचे कन्वेशन सेंटर बांधले जाईल.