Goa Government Scrap  
गोवा

Goa Government Scrap | गोव्यात गेल्या 3 वर्षांत 838 सरकारी वाहने भंगारात; तिजोरीत 4.69 कोटींचा महसूल जमा!

Goa Government Scrap | गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनने गेल्या तीन आर्थिक वर्षांत ८३८ भंगार व वापरास अयोग्य सरकारी वाहनांची लिलावाद्वारे विल्हेवाट लावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनने गेल्या तीन आर्थिक वर्षांत ८३८ भंगार व वापरास अयोग्य सरकारी वाहनांची लिलावाद्वारे विल्हेवाट लावली आहे. त्यातून राज्याच्या तिजोरीला ४.६९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

आणखी १२० सरकारी वाहने भंगारात काढण्यासाठी निवडण्यात आली असून, त्यातील बहुतांश वाहने सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित आहेत.
राज्य सरकारने भंगार व वापरास अयोग्य वाहनांच्या विल्हेवारीसाठी महामंडळाची नोडल संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. खराब किंवा वापरात नसलेल्या आणखी १२० वाहनांवर विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महामंडळाच्या नोंदीनुसार, २०२३-२४ मध्ये १२१, तर २०२४-२५ मध्ये ६१ वाहनांची विल्हेवाट लावण्यात आली. २०२५-२६ मध्ये ६५६ वाहनांचा लिलाव करण्यात आल्याने तीन वर्षांतील एकूण संख्या ८३८ झाली आहे. या लिलावातून सरकारला एकूण ४.६९ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
विल्हेवाट लावण्यात आलेल्या वाहनांमध्ये जुन्या सरकारी कार, जीप, मोटारसायकल्स, बस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, ट्रक, रोड रोलर आणि टँकर यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT