CM Pramod Sawant 
गोवा

Goa Anganwadi Workers | खुशखबर... अंगणवाडी सेविकांना आता मिळणार दरवर्षी वेतनवाढ

Goa Anganwadi Workers | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; 780 सेविकांचा सन्मान

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अंगणवाडी सेविकांना यापुढे दरवर्षी वेतनवाढ दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. यापूर्वी दर पाच वर्षांनी वेतनवाढ दिली जात होती. ताळगाव येथील सभागृहात महिला व बाल कल्याण खात्यातर्फे सोमवारी आयोजित राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बाल कल्याणमंत्री विश्वजीत राणे, खात्याचे सचिव यतिंद्र मराळकर, संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीबाबत मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी चर्चा केली असून, वार्षिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही नवीन प्रणाली १ डिसेंबरपासून की १ जानेवारीपासून लागू करायची, याचा निर्णय वित्त आणि महिला व बाल विकास विभाग लवकरच घेईल, हा देशातील विक्रम ठरेल, असेही ते म्हणाले.

विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे:

यावेळी मंत्री विश्वजीत राणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सेवेत २५ वर्षे पूर्ण केलेल्या ७८० अंगणवाडी सेविकांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धांतील सहभागी मुलांना बक्षिसेही वितरित करण्यात आली.

ताळगावमधील महिला, मुले आणि कुटुंबांपर्यंत पोषण, आरोग्यविषयक जागरूकता आणि कल्याणकारी सेवा पोहोचवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून मातृत्व व बालकल्याणसह महिला सबलीकरणाला चालना देण्यावर सरकारचा भर असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT