Goa Medical College IVF success Pudhari
गोवा

Goa News | गोमेकॉतील मोफत आयव्हीएफमुळे 14 महिलांना मिळाले मातृत्वाचे सुख

लोकाभिमुख आरोग्यसेवा मॉडेलमध्ये राज्य आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

Goa Medical College IVF success

पणजी : बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातील सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान केंद्राच्या (एआरटी) माध्यमातून 131 रुग्णांवर इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) उपचार करण्यात आले. त्यापैकी 25 प्रकरणे सकारात्मक आढळली असून 14 यशस्वी प्रसूती झाल्या असून दोन गर्भधारणा सुरु आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

मंत्री राणे म्हणाले की, सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा या दूरदृष्टीवर आधारित, लोकाभिमुख आरोग्यसेवा मॉडेलमध्ये राज्य आघाडीवर आहे. गोमेकॉमधील एआरटी केंद्राच्या माध्यमातून जोडप्यांना मोफत आयव्हीएफ उपचाराद्वारे पालकत्वाची भेट दिली जात आहे. त्यामुळे ही सेवा मोफत देणारे जीएमसी हे भारतातील एकमेव सरकारी रुग्णालय ठरले आहे, असेही राणे म्हणाले.

राणे म्हणाले, आतापर्यंत 446 वंध्यत्व रुग्णांची नोंदणी झाली आहे. 131 रुग्णांवर आयव्हीएफ उपचार (167 सायकल) करण्यात आले असून, त्यापैकी 25 प्रकरणे सकारात्मक आहेत, ज्यात 14 यशस्वी प्रसूती झाल्या आहेत आणि दोन गर्भधारणा सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT