vishwajit-rane Pudhari File Photo
गोवा

Vishwajit Rane | गोव्यातील आरोग्य सेवेत मोठा बदल! गोमेकॉमध्ये लवकरच AI आधारित उपचार सुविधा

Vishwajit Rane | गोव्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळात (गोमेकॉ) लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रगत आरोग्य सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी केली.

गोमेकॉ इस्पितळात आयोजित कार्यक्रमात बोलताना राणे यांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती दिली. या तांत्रिक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून 'अनब्लॉक' या संस्थेसोबत अधिकृत करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यासाठी मोठ्या शहरांतील इस्पितळांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना स्थानिक पातळीवरच अधिक अचूक आणि वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून वैद्यकीय सेवांचा दर्जा आणि उपलब्धता सुधारण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. जीएमसीतील प्रारंभिक अंमलबजावणीनंतर राज्यभर विस्तार झाल्यास या सेवेचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांना मिळण्याची शक्यता आहे.

टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार

सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा गोमेकॉममध्ये सुरू करण्यात येईल. त्यानंतर तिचा टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर भागांमध्ये विस्तार करण्याचे सरकारचे नियोजन आहे. या प्रकल्पाची राज्यव्यापी अंमलबजावणी झाल्यास गोव्याच्या कोणत्याही भागातील रुग्णांना तज्ज्ञांचे वैद्यकीय मार्गदर्शन आणि पुराव्यांवर आधारित उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT