Gas Shortage Pudhari
गोवा

Goa Gas Shortage 2026 | हॉटेल, रेस्टॉरंटवर दिसू लागले परिणाम

Goa Gas Shortage 2026 | सिलिंडरसाठी पेडणेत ग्राहकांच्या रांगा; लोक चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

एका बाजूने कमर्शियल गॅस सिलिंडर यांची टंचाई असल्यामुळे घरगुती सिलिंडर मिळावेत, यासाठी पेडणे गॅस कार्यालयाकडे ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या युद्ध सुरू असल्यामुळे गॅस टंचाई भासत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.

त्यामुळे ग्राहकांनी आपापल्याला सिलिंडर मिळावेत, यासाठी थेट आता सिलिंडर घेऊनच याच कार्यालयात ररांगेमध्ये उभा राहील, असल्याचे चित्र दिसून येते. काही गैस वाहने घरोघरी सिलिंडर पोहचवतात; परंतु अवश्य असलेल्या ग्राहकांना सिलिंडर मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या बाजूने कमर्शियल गॅसची टंचाई प्रमाणात मोठ्या असल्यामुळे काही हॉटेल स्टॉरंटवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

गोव्यातील मडगाव परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईने नागरिकांची चिंता वाढवली असून स्वयंपाकाच्या दैनंदिन गरजांवर त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. काही भागांत गॅस सिलिंडरचा पुरवठा उशिरा होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने घरगुती वापरासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या परिस्थितीमुळे अनेकांनी पर्यायी स्वयंपाकाच्या साधनांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गॅस सिलिंडर कधी मिळेल, याबाबत अनिश्चितता असल्याने अनेक रहिवासी इंडक्शन स्टोवा खरेदी करण्याकडे वळत आहेत. विजेवर चालणारे हे उपकरण तात्पुरत्या स्वरूपात स्वयंपाकाची सोय उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांसाठी हा एक पर्यायी मार्ग ठरत आहे.

त्यामुळे गॅसवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज कमी होत असल्याचेही काही रहिवाशांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स दुकानांच्या मालकांच्या मते, मागील काही दिवसांत इंडक्शन स्टोव्हची मागणी अचानक वाढली आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे खबरदारीचा उपाय म्हणून घरात इंडक्शन स्टोव्ह ठेवण्याचा निर्णय घेत आहेत, जेणेकरून गॅसचा पुरवठा खंडित झाल्यास स्वयंपाकाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत.

तातडीने उपाययोजना करावेत

दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने या समस्येकडे गांभीयनि लक्ष देऊन एलपीजी सिलिंडरचा नियमित आणि सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे. गॅस टंचाईची समस्या लवकर सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

गरम पाणी विसरा आता !

पेडणे येथील काही हॉटेलमधून गरम पाणी सुद्धा ग्राहकांना मिळण्यास अडचणी येतात. तर काही किनारी भागातील रेस्टॉरंटमधून आपल्या मेनूमध्ये जे दररोज खाद्यपदार्थ जेवण तयार केले जातात. त्यातील काही पदार्थ कमी केलेले आहेत, असेही चित्र दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT