पणजी : जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तासाठी श्रद्धाळूंची महाराष्ट्रातून पायी वारी सुरू झाली आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातून चालत येणारे माणसांचे जथ्थे रस्तोरस्ती दिसत असून पावले चालती जुने गोवेची वाट असे चित्र आहे. पायी चालणाऱ्यांमध्ये मुले, महिला, वृद्धांचाही लक्षणीय सहभाग आहे.
कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या या जथ्थ्यात दरवर्षी जशी ठराविक माणसे असतात,तशीच नवनवीन माणसे पायी वारीत सहभागी होत असतात. काहीजण भजन गात, टाळ वाजवत पायी प्रवास करायचे.
ख्रिस्ती समाजाप्रमाणेच हिंदू समाजातील अनेकजण फेस्तासाठी येतात. एका जथ्थ्यातील फादरशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही रात्री डिचोली येथे आराम करणार आहोत. तेथे दरवर्षी आम्ही थांबतो. तर अन्य भाविकांनी बाहेरून येणाऱ्या श्रद्धाळूंची राहण्याची सोय चर्च परिसरात असते. पण, आमच्यापेक्षा लांबून येणाऱ्यांना ती मिळावी, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही वाटेत थांबत थांबत जातो, असे सांगितले.