Raw Chicken Storage 
गोवा

Goa FDA Action | अन्न आणि औषध प्रशासनाकडून 1,500 किलो चिकन नष्ट

Goa FDA Action | अन्न आणि औषध प्रशासनाकडून १,५०० किलो चिकन नष्ट; शिवोलीत दुकान बंद करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शिवोली येथील एका चिकन दुकानावर कारवाई करत ते बंद केले. अनिवार्य अन्न सुरक्षा परवान्याशिवाय चिकनवर प्रक्रिया करून त्याचे वितरण केले जात असल्याचे आढळून आल्याने सुमारे १,५०० किलो प्रक्रिया केलेले चिकन नष्ट करण्यात आले. तसेच, कोल्हापूरस्थित पुरवठादार रेस्टॉरंट परवान्याअंतर्गत चिकनचा पुरवठा करत असल्याचे आढळल्याने एफडीएने महाराष्ट्रातील संबंधित विभागाला याची माहिती देत कारवाईची मागणी केली आहे.

हसन बेपारी यांच्या मालकीच्या 'फ्रेश चिकन' हे दुकान आवश्यक अन्न सुरक्षा परवान्याशिवाय चिकनवर प्रक्रिया करून त्याचे वितरण करत होते. सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी सुमारे १,५०० किलो प्रक्रिया केलेले चिकन नष्ट करण्यात आले असून, दुकान बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती नियुक्त अधिकाऱ्याने दिली.

हॉटेलमध्ये केलेल्या मागोवा तपासणीतून मिळालेल्या माहितीनुसार, शिवोलीतील एक विक्रेता आवश्यक परवान्याशिवाय मर्यादित स्वरूपात चिकनवर प्रक्रिया करून त्याचे वितरण करत असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले.

त्यानंतर एफडीएच्या उत्तर विभागाचे निरीक्षक रिचर्ड नोरोन्हा यांनी संबंधित दुकानाची तपासणी करून ही कारवाई केली. याच दुकानदाराकडून एका तात्पुरत्या खोलीत बिरयानी तयार करून परवरीच्या दुकानानाला पुरवली जात असल्याचेही तपासात आढळले. त्यामुळे त्याचे स्वयंपाकघर बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
दुसऱ्या एका तपासणीत एफडीएने 'मेसर्स शिवोली चिकन' या अन्य पुरवठादाराची तपासणी केली. त्याची पुरवठा साखळी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 'रिया फॅन्स'पर्यंत असल्याचे उघड झाले. हे फार्म रेस्टॉरंट परवान्याअंतर्गत चिकनचा पुरवठा करत असल्याचे आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT