What Is A2 Ghee  Canva
गोवा

Goa FDA Ban On Ghee Brands | गोव्यात निकृष्ट दर्जाच्या तुपावर एफडीएचा बडगा! या ब्रँडच्या विक्रीवर तत्काळ बंदी

Goa FDA Ban On Ghee Brands |श्री सारस, गोकुळ, श्रद्धा ब्रँड उत्पादनावर तत्काळ बंदी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब समोर आल्यानंतर गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निकृष्ट दर्जाचे आढळलेले काही तूप, तसेच एव्हरेस्ट जिरे पावडर यांच्याविरोधात कठोर कारवाई केली आहे. श्री सारस, गोकुळ आणि श्रद्धा या ब्रँडच्या तुपाच्या संबंधित उत्पादनांवर तत्काळ बंदी घालण्याबरोबरच बाजारातून उपलब्ध साठा परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एफडीआयकडून अन्नपदार्थांच्या तपासणीदरम्यान संबंधित उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित तुपाची खरेदी, विक्री, वितरण किंवा वापर तातडीने थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय एव्हरेस्ट जिरे पावडर या उत्पादनाबाबतही अन्नसुरक्षेचा इशारा देण्यात आला असून, संबंधित उत्पादन बाजारातून परत मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एफडीएने ग्राहक तसेच अन्न व्यवसाय चालकांना त्यांच्या ताब्यात संबंधित उत्पादनांचा साठा असल्यास तो वापरू नये, विक्री करू नये आणि पुढील सूचनांसाठी एफडीएच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

अन्न व्यावसायिकांनाही सूचना:

हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने, किरकोळ विक्रेते, तसेच इतर अन्न व्यावसायिकांनी संबंधित ब्रँडचे तूप किंवा एव्हरेस्ट जिरे पावडरचा साठा तपासून तो तातडीने विक्री व वापरातून काढून घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्राहकांनीही घरात या उत्पादनांचा साठा असल्यास त्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे बाजारात विक्री होणाऱ्या पॅकेज्ड अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि लेबलवरील माहितीवर अधिक काटेकोर नजर ठेवण्यात येत आहे. संबंधित उत्पादनांच्या साठ्याबाबत पुढील कारवाई आणि तपासणी एफडीकडून केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT