पणजी: काव्या कोळस्कर
मागील वर्षभरात राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तपासणी मोहिमांचा सपाटाच सुरू केला असल्याने विभागाच्या कामाबद्दल, नियमांबद्दल आणि अत्रपुरवठादारांनी घेण्याच्या खबरदारीबद्दल समाजामध्ये तळागाळात जागृती झाली. परिणामी विभागाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरू झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. मागील वर्षभरात विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ लाख ९२ हजार ७१० रुपयांच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली आहे.
संचालिका श्वेता देसाई यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कामाला एक गती मिळाली. ज्यामुळे अधिकाऱ्यांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या आधारे त्यांनी तपासणी मोहिमेला जोर दिला. दोन्ही जिल्ह्यात नियुक्त अधिकाऱ्यांनी गाडे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फळविक्रेते अशा सर्वच विक्रेत्यांची तपासणी करत नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कडक कारवाई केली.
गोवा हे देशातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असल्याने इथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना अञ्जपुरवठा सुविधांमध्ये त्रुटी जाणवल्यास ते थेट विभागाकडे तक्रार करत असल्याने वर्षभरात किनारी भागात विशेष तपासणी मोहिमा राबवून भेसळयुत्क्ता अनपदार्थ आणि सुकामेवा जप्त करून पर्यटकांच्या आणि सोबतच नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवण्यात आला वारंवार सुरू असलेल्या तपासणी मोहिमेमुळे परिणामी प्रत्येक दुकानदारांमध्ये चर्चा होऊ लागली.
अधिकाऱ्यांच्या भीतीमुळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट, हटिल्स, रेस्टॉरंट या सोचतच रस्त्यावरील गाड्यांमध्येही स्वच्छतेबाबत काळजी घेण्याची जागृती निर्माण झाली. त्यामुळे आता विभागाकडे येणाऱ्या तक्रारीचे प्रमाणही वर्षभराच्या तुलनेत कमी झाले आहे.
राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनातर्फे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्यात कुठेही भेसळयुक्त अत्रपदार्थ विक्री किंवा साठवणूक केली जाऊ नये यासाठी विभागाचे अधिकारी कार्यरत असल्यामुळे सध्याच्या काळात अनेक ठिकाणी श्वेता देसाई स्वच्छ वातावरणात अन्न निर्मिती, साठवणूक आणि बिक्री केली जात असून, तपासणी दरम्यान फार कमी ठिकाणी भेसळ होत असल्याचे समोर आल्याची माहिती संचालिका श्वेता देसाई यांनी पुढारीशी बोलताना दिली.
वर्षभरात राबवलेल्या मोहिमांद्वारे आणि सर्व ठिकाणी केलेल्या तपासणीमध्ये प्रामुख्याने मावा २२६० किलो, केळी ३४५० किलो, काजू ४०७५ किलो आणि चिकन ३००० किलो हे पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. जानेवारी ते डिसेंबर महिन्यात उत्तर गोव्यात नमकीन चिकन, पनीर, फले असे एकूण ८९४५ किलोचा तर दक्षिण गोळ्यात ६६६८ किलोचा मुद्देमाल जाप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
धडाधड तपासणी मोहिमा
सर्व प्रकारच्या आस्थापनांची तपासणी
केमिकलचा वापर करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर करडी नजर
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द
अनेक आस्थापनांना नोटीस आणि सुधारणेस वाव
अन्नपदार्थ उत्पादन, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये नियमांबाबत जागरूकता