Jalna Temperature jalna photo
गोवा

Goa Temperature Update| गोव्यात उष्णतेची तीव्रता वाढणार; 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Goa Temperature Update | 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंड हवामानाची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढू शकते. विशेषतः १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत दिवसाचे कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानासोबत आर्द्रतेचे प्रमाणही अधिक राहिल्यास प्रत्यक्ष जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचू शकते.

राज्यात सध्या नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असलेला थंडावा जाणवत नसून, उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सोमवार दि. ९ रोजी राज्यातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

वाढत्या आर्द्रतेमुळे वातावरण अधिक दमट आणि त्रासदायक बनले होते. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यावरही उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. काजू आणि आंबाला मोहोर येण्यासाठी थंड आवश्यक असते. राज्यात आंबा आणि काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकऱ्यांची मदार थंडीवर असली, तरी यावर्षी थंडीचे प्रमाण अत्यल्प आहे.

पावसाची यावर्षी जवळपास ३५ ते ४० टक्के तूट आहे. त्यामुळे आंबा व काजूला पावसासह थंडीही मिळत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी চিন্তेत आहेत. यावर्षी थंडीमुळे काजू व आंबा हंगाम लांबणीवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१५ नोव्हेंबरपर्यंत ग्रीन अलर्ट...

हवामान विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यासाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वादळ किंवा पावसाची शक्यता नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पावसापासून दिलासा असला, तरी वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे. थंड हवामानासाठी गोमंतकीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT