डिचोली : पुढारी वृत्तसेवा
डिचोली तालुक्यातील मये, लाटंबार्से कारापूर पाळी या चार मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया शांतता पूर्ण ववातावरणात पार पडली काही ठिकाणी शाब्दिक चकमक वगळता प्रक्रिया शांततेच झाली साधारण चारपर्यंत ७५ च्या आसपास मतदान झाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सुलक्षणा सावंत यांनी कोठंबी पाळी मतदार केंद्रावर मतदान केले. तर त्यांची कन्या कुमारी पार्थिवी सावंत हिने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळच्या सत्रात काही ठिकाणी गर्दी तर काही ठिकाणी सामसूम होते. ११.३० नंतर काही केंद्रावर गर्दी दिसून आली. विविध मतदान केंद्रावर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते गटागटाने आपापल्या परीने फिल्डिंग लावताना दिसत होते.
१०३ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे मतदान ज्येष्ठ नागरिकांनी मतदान प्रक्रियेत मोठा सहभाग दिल्याचे दिसून प्रकृती ठीक नसतानाही दाखवत यशोदा गावस नावेली साखळी येथील १०३वर्षीय ज्येष्ठ महिलेने मतदान केले. विविध मतदार संघातील १५ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे.
मये, कारापूर जागा भाजपच्याच :
आमदार शेट्ये डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी जनतेला सरकारवर पूर्ण विश्वास आहे डबल इंजिनमुळे विकास साधला जातोय. राज्य सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आखलेली माझे घर व इतर योजना उत्तम आहे. जनता निश्चितपणे भाजपला विजय करणार, असा विश्वास व्यक्त केला. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये व कारापूर दोन्ही जागा भाजप जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.