धावे : अपघातग्रस्त वाहने. 
गोवा

Goa Dhave youth accidental death | कालमणी-चोर्ला येथे दुचाकीची बसला धडक; युवकाचा जागीच मृत्यू

Goa youth dies in Chorla Ghat accident- कालमणी-चोर्ला येथे दुचाकीची बसला धडक; युवकाचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

धावे : दिवाळी सणानिमित्त गोव्याहून आपल्या गावी खानापूर येथे जात असताना खानापूर-चोर्ला मार्गावर कालमणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.

दिवाळी कुटुंबीयांसोबत साजरी करण्यासाठी हा युवक रविवारी सकाळी दुचाकीवरून गोव्याहून खानापूर तालुक्यातील आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता. खानापूर चोर्ला मार्गाने प्रवास करत असताना कालमणी गावाजवळ त्याच्या दुचाकीची मिनी व्होल्वो टुरिस्ट बसशी जोरदार धडक झाली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.

खानापूर-चोर्ला मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असल्याने वाहनचालकांना विशेष सावधगिरी बाळगावी लागते. मात्र, या अपघातामुळे दिवाळीसाठी गावी येणाऱ्या युवकाचा प्रवास दुःखद घटनेत संपला.

अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित असलेले काँग्रेस कार्यकर्ते दीपक कवठणकर यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला फोन करून बोलावले. मात्र, रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव समजू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT