पणजी : पुढारी वृत्तसेवा
देशभरात २०२४ या वर्षात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत ६ टक्क्यांनी घट झाली असली तरी गोव्यात त्याचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले आहे. तपासकामाच्या क्षेत्रात गोवा आघाडीवर असून हे प्रमाण ९६ टक्के आहे.
जी देशात सर्वाधिक आहे, अशी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) च्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. गोव्यात २०२४ मध्ये गंभीर गुन्ह्यांची संख्या २०२३ च्या तुलनेत अधिक होती. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.
यामध्ये बलात्काराची ११४ प्रकरणे, २९ हत्या, १६१ ड्रग्ज प्रकरणे, विनयभंगाची १२० प्रकरणे तसेच महिलां-वरील गुन्ह्यांमध्ये बलात्काराच्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. यातील अनेक प्रकरणांमध्ये पीडित महिला या गुन्हेगाराच्या ओळखीच्या होत्या.
२०२३ मध्ये देशात ६२.४१ लाख गुन्हे नोंदवले गेले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ५८.८५ लाखांवर आली आहे. लोकसंख्येच्या प्रति लाखामागील गुन्हेगारी दरही २०२३ मधील ४४८.३ वरून २०२४ मध्ये ४१८.९ पर्यंत घसरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे गुन्ह्यांचा तपास आणि आरोपपत्र दाखल करण्यात केरळम, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आघाडीवर राहिली.
केरळममध्ये २४.५ टक्के प्रकर-णांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर पुद्दुचे-रीमध्ये हा दर २१ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ९०.४ टक्के इतका होता. अहवालानुसार, भारतीय दंड संहिता आणि भारतीया न्याय संहितेअंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये २६.७८ लाखांहून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली त्यापैकी ४३.११ लाखांहून अधिक प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले असून १०.७१ लाखांहून अधिक आरोपी दोषी ठरले आहेत.
२७.०१ लाख प्रकरणांत आरोपपत्र
विशेष कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये १८.६५ लाखांहून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली. तसेच २७.०१ लाख प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले असून १७.२१ लाख आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दुखापत आणि गंभीर दुखापतीच्या प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.