म्हापसा : साळगाव, मुड्डावाडो येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या विनोद राठोड (वय ४०, रा. कर्नाटक) या मजुराने पत्नी रुक्मिणी राठोड (४०) हिचा खून केला. ही घटना शुक्रवारी घडली.
राठोड जोडपे साळगाव येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. दोघेही मजुरीचे काम करीत होते. विनोद याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पैशांवरून त्यांची नेहमी भांडणे होत. शुक्रवारी अशाच भांडणानंतर विनोद राठोड याने पत्नी रुक्मिणी राठोड हिचा गळा आवळून खून केला व नंतर त्याने साळगाव पोलिस स्थानकात जाऊन खुनाची कबुली दिली.
घटनेची माहिती मिळताच साळगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक दिनेश गडेकर, उपनिरीक्षक सर्वेश भंडारी, उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून साळगाव पोलिसांनी मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला असून पुढील तपास करीत आहेत.