Gautam Khattar arrested  
गोवा

Goa crime news | गौतम खट्टरला घेऊन पोलिस पथक गोव्याकडे

ट्रान्झिट रिमांडवर हिमाचलमधून आज गोव्यात

पुढारी वृत्तसेवा

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गौतम खट्टर याला हिमाचल प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याला आणण्यासाठी शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेचे पोलिस पथक हिमाचलमध्ये पोहोचले होते. या पथकाने संशयित खट्टरला हिमाचल पोलिसांकडून ताब्यात घेऊन स्थानिक न्यायालयाकडून ३ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेतला. मात्र, तो मिळण्यास उशीर झाल्याने पथक चंदीगड विमानतळावर उशिरा पोहोचले आहे. त्यामुळे ते शनिवारी रात्री ऐवजी सकाळी मोप विमानतळावर पोहोचतील.

संशयित गौतम खट्टर परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास दयेकर आणि त्यांच्या पथकाने उत्तराखंड ते हिमाचल प्रदेश असा सलग पाठलाग केला, मोबाईल बंद करूनही तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी त्याचा शोध लावला. गौतम गोव्यातून पसार झाल्यापासून पोलिस त्याच्या मागावर होते.

तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मराल येथील एका दुर्गम टेकडीवरील श्री नीलकंठ मंदिराजवळ मठात लपला होता. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढला, मात्र हिमाचल प्रदेश पोलिसांनी मराल येथील चेक नाक्यावर सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. दरम्यान, गौतमचा भाऊ माधव यालाही याआधी अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT