डिचोली : बंदरवाडा डिचोली येथे बस स्थानकच्या मागील बाजूला इमारतीच्या खाली पार्क करून ठेवलेल्या उघड्या जीपमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली असून तिच्या नाकावर जखम असल्याने खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे व टीम तपास करत आहे. सदर महिला अंदाजे ५५ वर्षाची असन लक्ष्मी शिरोडकर नामक ही महिला मूळ तळे वाडा माटणे येथील असल्याचे सांगण्यात आले. ती या ठिकाणी राहत असल्याचे सांगण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार सदर महिला या परिसरात फिरायची व या ठिकाणी रात्री एका बरोबर तिचे भांडण झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी माहिती मिळताच ठाण्याचे उपाधीक्षक श्रीदेवी यांनी तसेच निरीक्षक विजय राणे व टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीम या ठिकाणी तपास करून गेली आहे.