मडगाव : भाडेकरू असलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने थेट घरमालकिणीच्या मानेवर वार करत 'तू अर्ध्या तासात मरशील', अशी भीषण धमकी दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध महिलेला त्याने घरातच डांबून ठेवले.
अमानुषतेचा कळस म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने त्यांच्याकडून चहा करून देण्याची मागणी केली आणि निर्वावलेपणाने चहा घेतला. त्यानंतर घरातील लॅपटॉप व मोबाईल फोन हिसकावून तो घटनास्थळावरून पसार झाला. मडगाव शहरातील कोंब परिसरात शुक्रवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री घडलेल्या या थरारक व अमानुष घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. कोंब हा भाग दाट लोक वस्तीसाठी ओळखला जातो.
सभोवताली घरे असून सुद्धा महिलेवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे या परिसरात भीतीचे वाताबरण पसरले आहे. सविस्तर माहितीनुसार कोनी पाशेको या ज्येष्ठ नागरिक घरात एकटघाच राहतात. रात्री उशिरा चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात एका व्यक्तीने प्रवेश केला. आरडा ओरड करून त्यानी शेजाऱ्याऱ्यांना मदतीसाठी बोलावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र धारदार शस्त्र घेऊन घरात दाखल झालेल्या त्या अज्ञात इसमाने तिथ्या मानेवर सुरा लावला. त्याला घार होती. त्यामुळे धमकावण्यासाठी लावलेल्या सुऱ्यामुळे तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली. मानेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्या अज्ञातचोराने तिला त्याच अवस्थेत टाकून घरातील मौल्यवान वस्तुवा शोध सुरू केला.
घरात बराच वेळ शोधा शोध केल्यानंतर त्याच्या हाती घरातील लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्य लागले होते. मात्र रक्ताच्या ठरवण्यात पडून असलेल्या कोनी हीच्याकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही. माणुसकीला काळीमा फासणारी घटना अशी की तिची मदत करण्याचे सोडून त्याने तिला घरात डांबले व तुम आधे घंटे के बाद मर जाओगे, असे हिंदीतून म्हणत त्याने तिला त्याच अवस्थेत सोडले.