Gold Smuggling Case Pudhari File Photo
गोवा

Gold Smuggling Case | दीड कोटीची सोने तस्करी; दोघांना अटक

Gold Smuggling Case | गोव्यात दीड कोटींचे द्रवबहुल सोने जप्त; गुन्हे शाखेची धारगळ-सुके कुळण येथे कारवाई, केरळमधील दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

धारगळ-सुके कुळण येथे गुन्हे शाखेच्या पथकाने १ किलो ३०० ग्रॅम / १.३०० किलो द्रवरूप सोने पकडले. या सोन्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी केरळ येथील दोघांना अटक केली असून हसन मूस नियाज (वय ३५) व मुहम्मद मोहम्मद अब्दुल रहिमान खुन्ही (वय ५७, दोघेही रा. कासारगोड, केरळ) अशी दोघांची नावे आहेत.

हसन नियाझ कतार एअरवेजच्या विमानाने दुबईहून गोव्याला आला होता आणि त्याच्यासोबत द्रवरूप सोन्याचा साठा होता. दुसरा संशयीत मुहम्मद खुन्ही केरळमधील कासारगोड येथून रेल्वेने मडगावला आला. तेथून हसन नियाझकडून माल घेण्यासाठी मोपा विमानतळावर गेला. त्यानंतर, दोन्ही संशयीत एकत्र प्रवास करीत होते. पोलिसांना आधीच माहिती मिळालेली असल्याने त्यांनी धारगळ येथील सुके कुळण येथे दोघांना अडविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT