गोवा

Goa COVID-19 Updates : गेल्या आठ दिवसांत 4,222 कोरोनामुक्‍त

मोनिका क्षीरसागर

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात (Goa COVID-19 Updates) कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू नियंत्रणात येत असून नव्या कोरोना बाधितापेक्षा बरे होणार्‍या कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.

दि. 8 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या आठ दिवसातील आकडेवारी पाहता या आठ दिवसांमध्ये 1,628 नवे कोरोनाबाधित सापडले तर 4,222 कोरोना बाधित बरे झाले आहेत. दि. 15 रोजी 2,012 कोरोना चाचण्या (Goa COVID-19 Updates) घेण्यात आल्या.

दिवसभरात (Goa COVID-19 Updates) 85 नवे कोरोनाबाधित सापडले तर 469 कोरोनाबाधित बरे झाले. मंगळवारी 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,777 झालेले असून राज्यात मंगळवारी 1,754 सक्रिय कोरोनाबाधित होते.

SCROLL FOR NEXT