Latur News  file photo
गोवा

Doctor Murder Case | "डॉक्टरच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अन् स्वयंपाक्याचा जामीन फेटाळला!; दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय"

Doctor Murder Case |बेताळभाटी येथे डॉ. निर्वाण भरत (वय २७) यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित असलेला डॉक्टरचा स्वयंपाकी सिमांचल परिदा तसेच त्याचा साथीदार नागेंद्र कुमार यांचे जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावले.

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

बेताळभाटी येथे डॉ. निर्वाण भरत (वय २७) यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित असलेला डॉक्टरचा स्वयंपाकी सिमांचल परिदा तसेच त्याचा साथीदार नागेंद्र कुमार यांचे जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावले. सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने आर्थिक परिस्थितीचा विचार करून संशयित शाहिद खान याच्या जामीन अटींमध्ये अंशतः बदल करत त्याची जामीन रक्कम कमी केली आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये बेताळभाटी येथील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मूळचे बिहारचे रहिवासी असलेले नेत्रतज्ज्ञ डॉ. निर्वाण भरत यांची गळा आवळून हत्या झाली होती. संशयितांनी डॉक्टरचा मृतदेह पलंगाच्या आत लपवून ठेवला आणि रोख रक्कम, लॅपटॉप व त्यांची चारचाकी गाडी घेऊन पळ काढला होता.

यानंतर कोलवा पोलिसांनी राजस्थानमधील भिलवाडा येथून संशयितांना अटक केली होती. परिदा सिमांचल याच्या जामीन अर्जावर सरकारी वकिलांनी हा संशयित पूर्ण गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे. तो मृत डॉक्टरकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होता.

हत्येनंतर तो डॉक्टरचे एटीएम कार्ड आणि त्यांची कार घेऊन राजस्थानला पळून गेला होता, असा युक्तिवाद केला. गुन्हा गंभीर असल्याने केवळ दीर्घकाळ तुरुंगात असण्याच्या कारणास्तव त्याला जामीन दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला. तर अन्य एक संशयित नागेंद्रने यापूर्वी फेटाळलेल्या जामीन अर्जांनंतर पुन्हा एकदा समान कारणांवरून न्यायालयात धाव घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT