वास्को: कुडाळी मतदारसंघात्ता विचार केला, तर काही अपवाद वगळता या मतदारसंघातील मतदारांनी भगो व काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे. गत विधानसभा निव्डणुकीत आंतोनियो वास यांनी या समीकरणाला छेद देत अपक्ष म्हणून विजय मिळविला. त्यांच्या विरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, आरजीपी, भाजपासह विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. मात्र, सर्वांचे आव्हान मोडून काढत त्यांनी विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला असला, तरी आगामी विधानसभा निवडणूकही ते अपक्ष म्हणूनच लढविण्याची शक्यता आहे.
लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने धावून जाणारा आमदार अशी वास यांची प्रतिमा आहे. गत निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेसचे प्रमुख आव्हान होते. सध्या तरी इतर कोणत्याही पक्षाकडून त्यांच्यासमोर तितके प्रमाती आव्हान दिसत नसले, तरी निवडणूक जवळ येताच राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीं. गत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार ओलैंसियो सिभोईस तसेच कुठ्ठष्ळी काँग्रेस गटाध्यक्ष पीटर डिसोझा है काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. पीटर डिसोझा हे माजी उपसभापती सायमन डिसोझा यांचे सुपुत्र असून, त्यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. मात्र, पीटर डिसोइत आणि ओलेसियो सिभोईस या दोघांचाही प्रभाव मर्यादित क्षेत्रापुरता असल्याचे बोलले जाते. कांसावली, कुठ्ठाली आणि वेळसाथ भागात वास यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते, तर सांकवाळ, झुआरीनगर, झरी आदी भागात भाजपची ताकद आहे.
या मतदारसंघातून माथानी साल्ढाणा आणि एलिना साल्ढाणा हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे भाजपने सर्वमान्य आणि सक्षम उमेदवार दिल्यास लढतीचे चित्र बदलू शकते. सध्या सांकवाळचे उपसरपंच तुळशीदास नाईक यांचे नाव भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चेत आहे. मात्र, पुढील काळात आणखी काही नावे पुढे वेण्याची शक्यता आहे. इतर पक्षांमध्ये अद्याप उमेदवारीबाबत विशेष हालचाली दिसत नसल्या, तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी मागील विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाच्या तिकिटाचर लढविली होती. आगामी निवडणुकीत त्या कोणत्या पक्षाकडून मैदानात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या मतदारसंघातून विद्यमान मंत्री माविन गुदिन्हो चार वेळा, तर माजी मुख्यमंत्री स्व. लुईस बार्बोझा तीन वेळा विजयी झाले होते. लुईस बार्वोइस मुख्यमंत्री झाले, तर माधानी सरडागा, एलिना सालडाणा आणि माविन मुदिन्हो यांनी मंत्रिपद भूषविले.
कुठ्ठाळी मतदारसंघाचा राजकीय इतिहास चढ-उतारांनी भरलेला आहे. १९६७ आणि १२७२ च्या विधानसभा निवडणुकांत गुंगीचे लुईस बाबौंझा यांनी अनुक्रमे अपक्ष उमेदवार एल. सी. काव्हालो आणि काँग्रेसचे टेलो भएकोरेन्हास यांचा पराभव करून विजय मिळविला. त्यानंतर १९७७ मध्ये फ्रोइलानो माशादो काँग्रेसतर्फे, तर १९८० मध्ये अर्स काँग्रेसतर्फे विजयी झाले. १९८४ मध्ये लुईस बार्बोझा यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला,
१९८९, १९९४ आणि १९९९ या सलग तीन विधानसभा निवडणुकांत माविन गुदिन्हो यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवून मतदारसंघावरील आपले वर्चस्व सिद्ध केले. १९९४ च्या निवडणुकीत त्यांनी युजीडीपीचे लुईस बाबौड़ना यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत सीपीआयचे ख्रिस्तोफोर फोन्सेका, भाजपाचे अॅथोनी फर्नांडिस, बीएसपीचे आंतोनियो फर्नाडिस आणि समाजवादी पक्षाचे वासुदेव देर्णेकर हेही रिंगणात होते.
२००२ मध्ये युजीडीपीचे माथानी साल्ढाणा यांनी माविन गुदिन्हों यांचा पराभव केला, त्या निवडणुकीत विद्यमान आमदार आंतोनियो वास यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. २००७ मध्ये मुदिन्हो यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर माधानी साल्वाणा यांचा पराभव करत मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.
२०१२ मध्ये दाबोली मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर गुदिन्हो यांनी कुठ्ठाळीऐवजी दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्याचवेळी माथानी साल्ढाणा यांनी बुजीडीपीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. त्यांनी गोवा विकास पक्षाच्या नेली रोड्रिग्ज यांचा पराभव करून विजय मिळविला, त्या निवडणुकीत युजीडीपीचे रमाकांत बोरकर, काँग्रेसचे कावताना झेव्हियर आणि तृणमूल काँग्रेसचे टोलोतिनो डिमोहा हेही रिंगणात होते.
सिभोईस, युजीपीचे रमाकांत बोरकर आणि गोवा सु-राज पक्षाचे शरण मेटी हेही उमेदवार होते. निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांची बिनविरोध निवड झाली. २०१७ मध्ये एलिना साल्ढाणा यांनी भाजपाच्या तिकिटावर अपक्ष उमेदवार आंतोनियो वास यांचा अवध्या ५१८ मतांनी पराभव केला. त्या निवडणुकीत काँग्रेसचे गिल्बर्ट मारियानो रॉड्रिग्ज, गोवा विकास पक्षाच्या नेली रॉड्रिग्ज, आम आदमी पक्षाचे ओलेसियो २०२२ च्या विधानसमा निवडणुकीत आंतोनियो वास यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवत मतदारसंघावर आपला प्रभाव सिद्ध केला. त्याच निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांना अपेक्षित यश मिळाले.
रेल्वे मार्ग दुपदरीकरण,. कोळसा वाहतुकीवरून वास यांच्यावर टीका...
सध्या मतदारसंघात कांसावली येथील रेल्वे मार्ग दुपदरीकरण, रेल्वेमार्गावरील कोळसा वाहतूक, पर्यावरण संवर्धन तसेच रेल्वे उडाणपूल की भुयारी मार्ग या प्रश्नांवरून चर्चा सुरू आहे. या मुद्रांवरून आमदार वास यांच्यावर टीका होत असली, तरी या आंदोलनांचा प्रभाव प्रामुख्याने काही भागांपुरता मर्यादित असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
सरकारला पाठिंबा दिल्याने विकास...
दूसरीकडे, भाजप सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मतदारसंघात विकासकामांना गती मिळाल्याचा दवा वास यांचे समर्थक करतात, कुठ्ठाळी शेतकरी क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी सेवा, पेरणी यंत्रांची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच झरे आणि तळ्यांच्या संवर्धनासाठीही त्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते.
काँग्रेसला संघघटित होण्याची गरज...
राजकीय विश्लेषकांच्या मते, कंग्रेिसने अंतर्गत मतभेद दूर करून संघटना मजबूत केली, तसेच पक्ष सोडून गेलेल्या कार्यकत्यांना पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळविले, तर या मतदारसंघात चुरशीची लढत होऊ शकते. गिल्बर्ट मारियानो रॉड्रिग्ज आणि ओलेंसियो सिगोईस यांचा काही भागात अजूनही प्रभाव असल्याचे मानले जाते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत आंतोनियो वास यांच्याविरोधात सक्षम आणि सर्वमान्य पर्याय उभा राहिलेला नसल्याने आगामी निवडणुकीतही त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे