Girish Chodankar  
गोवा

Girish Chodankar | प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन; केंद्र सरकारकडून उत्तरदायित्वाची मागणी

Girish Chodankar | मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या!

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थ्यांचे हित जपण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि देशाच्या शिक्षण व परीक्षा प्रणालीची सतत होणारी घसरण होऊ दिल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, या व अन्य मागण्यांचे निवेदन आज, बुधवारी प्रदेश काँग्रेसतर्फे गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांना देण्यात आले.

प्रदेश काँग्रेसतर्फे दिलेल्या निवेदनात, विद्यार्थी आंदोलने दडपण्यासाठी जबाबदार असलेल्या कायदा-सुव्यवस्थेला जबाबदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर निष्पक्ष चौकशीद्वारे तत्काळ कारवाई करावी, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राला भेडसावणाऱ्या संकटावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा व्हावी व आंदोलक विद्यार्थ्यांवरील फौजदारी खटले मागे घ्यावेत, अशा मागण्या नमूद केल्या आहेत.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने, कार्याध्यक्ष एम. के. शेख, आमदार ॲड. कार्लोस फेरेरा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अर्चित नाईक यांच्यासह चोडणकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन या मागण्यांचे निवेदन दिले.

चोडणकर यांनी निवेदन दिल्यानंतर ही माहिती दिली. या निवेदनासोबत अन्य एक निवेदन देऊन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध करण्यात आला, असे चोडणकर यांनी सांगितले. मंगळवारी रात्री काँग्रेसने लोकभवनवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांनी तो अडवला होता. त्यानंतर बुधवारी काँग्रेसने निवेदन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT