काँग्रेस  Pudhari Photo
गोवा

Goa Elections 2027 | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन; जनतेकडून मागवल्या जाहीरनाम्याच्या सूचना

Goa Elections 2027 | फोडाफोडीच्या राजकारणाला काँग्रेसचा नकार; गोव्यात स्वबळावर लढण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर बहुमताचा आकडा पार करून सरकार स्थापन करेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. पक्षाने फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णपणे नकार दिला आहे.

अनेकांनी पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र पक्षाने ते नाकारल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. राजकीय फोडाफोडीविरोधातील आपली भूमिका पक्षाने पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. दरम्यान, २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी जनतेच्या सूचना मागवण्यासाठी काँग्रेसने विशेष हेल्पलाईन आणि ई-मेल सुविधा सुरू केली आहे. लोकांच्या सूचनांमधूनच पक्षाचा अजेंडा ठरवला जाणार आहे.

उज्ज्वलाचे ७० कोटी आहेत कुठे? : पणजीकर

गोवा उज्ज्वला योजनेंतर्गत निधीच्या वापरावरून काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी सरकारला सवाल केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, त्यातील केवळ ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. उरलेल्या ७० कोटी रुपयांचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT