पणजी : आत्ताच्या काळात सर्वांनाच संगणकाचे ज्ञान गरजेचे ठरत आहे. त्यामुळे यापुढे सरकारी नोकऱ्यांसाठी संगणक प्रमाणपत्र अनिवार्य केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. वेर्णा औद्योगिक वसाहतीत गुरुवारी मेगा जॉब फेअर २०२६ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळ (जीआयडीसी) चे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, संचालक दीपाक नाईक, वेर्णा औद्योगिक वसाहत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. नवीन सरकारी नोकरीच्या जागा भरल्या जातील, तेव्हा संगणक प्रमाणपत्र अनिवार्य केले जाईल. उमेदवारांना संगणक परीक्षा उत्तीर्ण करणे देखील आवश्यक असेल. तंत्रज्ञान जसजसे विकसित होत राहील, तसतसे सरकारी नोकऱ्यांच्या संरचनेत आणि कार्यपद्धतीतही बदल होतील, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्याबद्दल आणि स्वयंपूर्ण गोवा व विकसित भारत या संकल्पनांना निवडणूक दर पाच वर्षांनी होणारी परीक्षा राजकारणातही टिकून राहणे शक्य नाही. राजकारणात सक्रिय राहण्यासाठी, आपल्याला अद्ययावत राहणे, नवीन मानकांशी जुळवून घेणे आणि त्याच स्तरावर काम करणे आवश्यक आहे. हे आता जुन्या पद्धतीचे राजकारण राहिलेले नाही. निवडणुका म्हणजे दर पाच वर्षांनी होणाऱ्या परीक्षेसारख्या आहेत. निवडणुका म्हणजे कामगिरीची पंचवार्षिक परीक्षा असतात. निवडून आल्यास गौरव, नाही आल्यास अपयश, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाटल्या गोळा करण्याचा व्यवसाय; १० वर्षांत २२ कोटींची कमाई गोव्यात असाही एक व्यावसायिक आहे की त्याने प्लास्टिक बाटल्या गोळा करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याने काही माणसे ठेवली आहेत, जी बाटल्या गोळा करून आणतात आणि त्यावर प्रक्रिया करतात. हा व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीने गेल्या १० वर्षांत २२ कोटी कमावलेत. त्यामुळे एखादा व्यवसाय कुठला आहे, त्यापेक्षा त्यात फायदा किती आहे हे बेरोजगारांनी पाहावे आणि त्या व्यावसायात उतरून आर्थिक प्रगती करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. बळकटी दिल्याबद्दल गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, वेर्णा इंडस्ट्रिज असोसिएशन आणि सर्व सहभागी उद्योगांचे अभिनंदन केले.
निवडणूक दर पाच वर्षांनी होणारी परीक्षा
राजकारणातही टिकून राहणे शक्य नाही. राजकारणात सक्रिय राहण्यासाठी, आपल्याला अद्ययावत राहणे, नवीन मानकांशी जुळवून घेणे आणि त्याच स्तरावर काम करणे आवश्यक आहे. हे आता जुन्या पद्धतीचे राजकारण राहिलेले नाही. निवडणुका म्हणजे दर पाच वर्षांनी होणाऱ्या परीक्षेसारख्या आहेत. निवडणुका म्हणजे कामगिरीची पंचवार्षिक परीक्षा असतात. निवडून आल्यास गौरव, नाही आल्यास अपयश, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाटल्या गोळा करण्याचा व्यवसाय; १० वर्षांत २२ कोटींची कमाई
गोव्यात असाही एक व्यावसायिक आहे की त्याने प्लास्टिक बाटल्या गोळा करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याने काही माणसे ठेवली आहेत, जी बाटल्या गोळा करून आणतात आणि त्यावर प्रक्रिया करतात. हा व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीने गेल्या १० वर्षांत २२ कोटी कमावलेत. त्यामुळे एखादा व्यवसाय कुठला आहे, त्यापेक्षा त्यात फायदा किती आहे हे बेरोजगारांनी पाहावे आणि त्या व्यावसायात उतरून आर्थिक प्रगती करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.