पणजी : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षीप्रमाणे नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र वामधूम सुरू असून उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पणजी बाजारपेठेत नाताळ सणानिमित्त लागणाऱ्या सर्व लहान मोठ्या वस्तू चिकण्यासाठी उपलब्ध असून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.
सर्वाच्या लाडक्या सांताक्लॉजला घरी आणण्यासाठी बच्चे कंपनीमध्ये आनंद आणि उत्साह दिसत आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त राज्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
गोव्यात हे दोन्ही उत्सव अतिशय जल्लोषात साजरे केले जातात. या पार्श्वभूमीवर आनंदमय नववर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेकजण या दिवसात गोव्यात दाखल होत असतात. पणजी मार्केटसह राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये झगमगाट असून नाताळच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
यामध्ये ख्रिसमस ट्री, येशू जन्मोत्सवासाठी लागणारे साहित्य, गोठा उभारणीचे सामान, विद्युत रोषणाईच्या माळा, फुलांचे हार, स्टार आकाशकंदील, आकर्षक मेणबत्या, गिफ्ट हॅम्पर, सांताक्लॉज अशा गोष्टी खरेदी केल्या जात आहेत.
गोड पदार्थाची रेलचेल
नाताळ सणात गोमंतकीय गोड पदार्थाना बाजारात विशेष मागणी असते. ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी वा दिवसांमध्ये केक, बेबींका, दीदील, नेवऱ्या इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात. हेच पदार्थ बाजारांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ५०० पासून १२०० रुपयांपर्यंत पर्यंत वेगवेगळे केक, २५० ते ३०० पर्यंत अर्धा किलो बेवीका, दोदोल तसेच २०० रुपयांपर्यंत प्लम केक्स खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.