पणजी : नोकरी मिळवून देण्यासाठी १७कोटी रुपये घेतल्याचे सांगणाऱ्या पूजा नाईक हिने ती रक्कम स्वतःवरच खर्च केली. आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्री आणि काही अधिकाऱ्यांची नावे घेतली. आतापर्यंत तिची ४.४३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली असून तिच्याकडे एकूण ८ कोटींची मालमत्ता सापडल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, पूजा हिचे सरकारशी किंवा कुणाशीही काहीही संबंध नाहीत. लोकांनी नोकरीसाठी पैसे देऊ नयेत. नोकरीतील भ्रष्टाचार दूर व्हावा, यासाठी आपण गोवा कर्मचारी भरती आयोग स्थापन केला.
त्या माध्यमातून पारदर्शकपणे भरती सुरू आहे. त्यामुळे लोकांनी नोकरीसाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले. कोर्टातील खटल्यांच्या निकालानंतर एकूण अहवाल आपण सर्वांसमोर सादर करू शकतो, असे ते म्हणाले. आ
मिषाला बळी पडू नका मुख्यमंत्री कॉल लेटर, अधिकृत जाहिरात आणि मुलाखतीशिवाय सरकारी नोकरी मिळू शकत नाही. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाग्यांची नावे सांगून कोणी नोकरीचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका. पैसे देण्याची प्रवृत्तीच थांबवली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले, पूजा नाईककडे ८ महागड्या गाड्या संशयित पूजा नाईक हिने जे १७कोटी घेतले त्यातून ८ महागड्या गाड्या खरेदी केल्या, तिच्या पत्तीच्या खात्यात ४ कोटी जमा होते. स्वतः पूजा व तिच्या मुलीच्या खात्यावरही पैसे आहेत. दोन फ्लॅट आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.