गोवा

NGT Goa Carbon Limited ruling 2026 | सां जुझे एरियलमधील कार्बन प्लांट बंद करण्यास नकार

Goa State Pollution Control Board | हरित लवादाने फेटाळली याचिका

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी), पश्चिम विभाग, पुणे यांनी सास्ती तालुक्यातील सां जुझे एरियल येथील कार्बन उत्पादन प्रकल्प कायमचा बंद करण्याची किंवा स्थलांतरित करण्याची याचिका फेटाळून लावली. याप्रकरणी अनुसूचित जमाती संघटना, सामाजिक न्याय मंच आणि राशोल रेसिडेंटस् वेल्फेअर असोसिएशन यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली होती.

लवादाने असा निर्णय दिला की, कंपनीने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काम करण्यासाठी वैध संमतीसह सर्व आवश्यक वैधानिक परवानग्या मिळवल्या आहेत. त्यामुळे कंपनी बंद करण्याचा किंवा स्थलांतराचा आदेश देण्यास नकार दिला.

अर्जदारांनी आरोप केला आहे की, कंपनी ३.०८ लाख टन प्रतिवर्ष (टीपीए) किंवा ८४३.८३ टन प्रतिवर्ष क्षमतेचा कॅल्सीनेशन प्लांट चालवत आहे. हा प्रकल्प येथे गेली ४० पेक्षा जास्त वर्षे आहे. एनजीटीने असे निरीक्षण नोंदवले की, कंपनीकडे सध्या ऑपरेट करण्यासाठी वैध संमती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT