Goa Fish Market Rates  Pudhari File Photo
गोवा

Mapusa Fish Market | म्हापसा मासळी मार्केटची दुरवस्था; गोवा कॅनकडून चिंता

Mapusa Fish Market | म्हापसा मासळी मार्केट इमारतीतील आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रलंबित प्रश्नांवर 'गोवा कॅन 'कडून तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

म्हापसा मासळी मार्केट इमारतीतील आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रलंबित प्रश्नांवर 'गोवा कॅन 'कडून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून योग्य कारवाई करावी, अशी विनंती करणारे पत्र संघटनेचे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी आरोग्य खाते सेवा संचालिका डॉ. रूपा नाईक यांना पाठवले आहे.

नगरपालिका म्हापसा बाजारपेठेतील अस्वच्छतेबद्दल ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. बाजाराची स्वच्छता राखण्याची संपूर्ण जबाबदारी म्हापसा नगरपालिकेची आहे.

परंतु स्वच्छतेचे निकष तपासण्यासाठी पालिकेकडे अद्याप कोणतीही प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित इमारतीमध्ये मासे, चिकन आणि मटण बाजार चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही? हे निश्चित करण्यासाठी या इमारतीची संयुक्त पाहणी करण्यात यावी.

या तीनही बाजारांमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यासाठी कोणतीही ठोस कार्यप्रणाली कार्यान्वित आहे की नाही? याची तपासणी व्हावी तसेच गोवा सार्वजनिक आरोग्य अधिनियम १९८५ आणि त्या अंतर्गत असलेल्या नियम १९८७ चे उल्लंघन झाल्याप्रकरणी नेमकी कोणती कारवाई किंवा उपाययोजना करणे आवश्यक आहे याचा सविस्तर अहवाल तयार केली जावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT