पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारने गोवा जमीन विकास व इमारत बांधकाम नियमावली, २०१० मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करताना ३०० चौ. मी. आणि त्यापेक्षा मोठ्या भूखंडांवर अतिरिक्त चटई क्षेत्रफळ (एफएआर) आणि इमारतीची अतिरिक्त उंची मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील सुधारित अधिसूचना नगर व शहर नियोजन खात्याने जारी करून त्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. या अधिसूचनेला उत्तर देण्यासाठी याचिकादाराने वेळ घेतल्याने पुढील सुनावणी १९ जानेवारी २०२७ रोजी ठेवण्यात आली आहे.
जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (पॉपुलेशन एन्युमरेशन) फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे. त्यासाठी दि. ९ ते २८ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणनेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रत्येक महानगरपालिकेने वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती नोडल अधिकारी म्हणून करून त्यांचे नाव व संपर्क क्रमांक जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांना कळवावेत. नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये मुख्याधिकारी किंवा प्रभारी अधिकारी ही जबाबदारी सांभाळतील. जिल्हाधिकारी आणि प्रमुख जनगणना अधिकाऱ्यांशी नियमित समन्वय ठेवण्याचेही निर्देश आहेत.
वाढीव एफएआर व उंचीसंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी गोवा भूविकास व इमारत बांधकाम (सुधारणा) विनियम २०२६ मध्ये बदल करून ते अधिसूचित केल्याची माहिती बुधवारी सरकारने उच्च न्यायालयाला सुनावणीवेळी दिली. त्यामुळे पुढील सुनावणी १९ जानेवारी २०२७ रोजी ठेवली आहे. उच्च न्यायालयात एफएआर व उंची वाढीच्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले आहे.
पीडीए व गैरपीडीए क्षेत्रांमध्ये अतिरिक्त एफएआर आणि उंचीसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांचाही नव्या नियमांनुसार फेरआढावा घेऊन नियमितीकरण करण्यात येणार आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांनाही या तरतुदींचा लाभ घेता येणार आहे. अशा प्रकल्पांसाठी गरजेनुसार प्रकरणनिहाय अतिरिक्त सवलती देण्याची तरतूदही केली आहे. या सुधारणेमुळे गोव्यातील ३०० चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांच्या बांधकाम क्षमतेत वाढ होण्याची शक्यता असून, विशेषतः पुनर्विकास आणि विविध विकास प्रकल्पांना याचा फायदा होऊ शकतो. नगरपालिका, नियोजन क्षेत्र, तसेच गाव क्षेत्रातील अशा भूखंडांना नगर व नगर नियोजन मंडळाच्या शिफारशीनुसार अतिरिक्त एफएआर आणि उंची मंजूर करता येणार आहे.
संबंधित भूखंडासाठी सध्या मंजूर असलेला एफएआर आणि रस्त्याची रुंदी यानुसार कमाल १५० पर्यंत अतिरिक्त एफएआर, तसेच १९.५ मीटरपर्यंत अतिरिक्त उंची मंजूर करता येईल. अतिरिक्त बांधकामाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एकूण एफएआर ३०० आणि इमारतीची कमाल उंची ४० मीटर यापेक्षा अधिक असता कामा नये. या अतिरिक्त एफएआर आणि उंचीसाठी आकारण्यात येणारे शुल्क सरकारकडून स्वतंत्रपणे निश्चित केले जाणार आहे. ही तरतूद निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, संस्थात्मक, वाहतूक, गोदाम तसेच दळणवळण क्षेत्रांना लागू राहणार आहे.
दरम्यान, सरकारने काही संवेदनशील आणि विशिष्ट प्रकल्पांना अतिरिक्त एफएआर व उंचीच्या सुविधेतून स्पष्टपणे वगळले आहे. त्यामध्ये चार आणि पाच तारांकित हॉटेल प्रकल्प, गोवा आयडीसी औद्योगिक वसाहती आणि औद्योगिक क्षेत्रे तसेच संरक्षित स्मारकांच्या बफर झोनचा समावेश आहे.