Goa BJP Rebellion News 
गोवा

Goa BJP Rebellion News | इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपपुढे बंडखोरीचे संकट

Goa BJP Rebellion News | ज्येष्ठ नेतेच बंडखोरीच्या पवित्रात असल्याने पक्षासमोर मोठा पेच; पक्षश्रेष्ठींसमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
उमेदवारी मिळाल्यास निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त असलेला पक्ष म्हणजे भाजप असे म्हटले जाते. जे आमदार होण्यास इच्छुक आहेत ते नवोदित किंवा माजी आमदारांना आपणास भाजपची उमेदवारी मिळावी असे वाटते. त्यामुळेच एका एका मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी तीन ते चार इच्छुक उमेदवार तयार झाले असून त्यातील बहुतांश उमेदवारांचा मतदारसंघात प्रभाव आहे. त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही, तर निश्चितपणे बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतेक सगळे नेते गेली अनेक वर्षे भाजपाचे काम करून आलेले आहेत. त्यामुळेच त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यांना डावलले तर निश्चितपणे बंद करतील असे सध्या तरी दिसते. ही भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. शिवोली मतदारसंघात तीनवेळा निवडून आलेले आणि महत्त्वाची मंत्रिपदे भूषवलेले दयानंद मांजरेकर हे भाजपचे व भंडारी समाजाचे नेते आहेत.

२०२२ च्या निवडणुकीत भाजपिने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या दिलायला लोबो यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर लोबो इतर सात आमदारांसह भाजपात दाखल झाले.
येत्या विधानसभा निवडणुकीत मांजरेकर यांना शिवोलीतून भाजपची उमेदवारी हवी आहे, मात्र भाजप दिलायला लोबो या विद्यमान आमदार असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

त्यासाठीच मांजरेकर यांची कामे अडवली जात असून त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावले जाते असे सांगत मांजरेकर यांनी गोवा सरकारच्या एससी व ओबीसी वित्त विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या आपण भाजपात असे असले ते सांगत असले तरी त्यांची काही वेगळे सांगते आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्यास ते बंडखोरी करणार, हे निश्चित आहे.
शिवोली जवळच्या साळगाव मतदारसंघात तशीच स्थिती आहे. २०२२ मध्ये तत्कालीन आमदार म्हणून भाजपाने जयेश साळगावकर यांना दिले होते. निवडणुकीत काँग्रेसने केदार नाईक यांनी साळगावकर यांचा पराभव केला आणि तेही लोबोंसह भाजपात दाखल झाले. जयेश साळगावकर यांनी भाजप सोडला आहे, माजी मंत्री परुळेकर हे भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असे सांगत असले तरी केदार नाईक यांना विद्यमान आमदार म्हणून जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य समर्थकांचे पाठबळ आहे.

त्यामुळे केदार नाईक यांना उमेदवारी नाकारल्यास तेही बंडखोरी करू शकतात.
राजेश फलदेसाई हे कुंभारजुवेचे आमदार आहेत. तेही २०२२ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारावरून निवडून येऊन त्यानंतर भाजपात दाखल झाले. या मतदारसंघात भाजप नेते, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी भरीव असे काम सुरू केले आहे. फलदेसाई यांच्याबाबत नाराजी असल्याने सिद्धेश नाईक यांना संधी आहे. मात्र फलदेसाई बंडखोरी करू शकतात.

कुडचडे मतदारसंघात विद्यमान आमदार काब्राल हे भाजपच्या उमेदवारावर तीनवेळा निवडून आले आहेत. या मतदारसंघात रोहन गावस देसाई यांचे जोरदार काम सुरू आहे. सांगे मतदारसंघात एसटीसाठी राखीव झाल्यास समाज कल्याण मंत्री फडदेसाई हेही कुडचडेत लढवण्यास इच्छुक आहेत. असे झाल्यास काब्राल यांची भूमिका पाहावी लागेल.

बाबूश मॉन्सेरात यांच्याविरोधात उत्तर पर्वरिकर हे अपक्ष राहिले आणि अवघ्या मतांनी ते पराभूत झाले. यावेळी उमेदवारी मिळण्याबाबत ते आशावादी आहेत. मात्र, मॉन्सेरात मतदारसंघात भाजपचे इच्छुक वाढलेले असल्याने उमेदवारी न मिळाल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यता दिसते.

त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपपक्षश्रेष्ठींची बरीच तारांबळ उडणार असे दिसते.
प्रिओळ व फोंडामध्ये काय होणार? भाजप व मगो युती प्रिओळ व फोंडवरून तुटण्याची शक्यता दिसते. युती टिकवण्यासाठी आमदार गोविंद गावडे यांना उमेदवारी दिली नाही, तर ते बंड करू शकतात. फोंड्यातही भाजपची उमेदवारी न मिळाल्यास रवी नाईक पुत्र रितेश नाईक वेगळा विचार करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT