पणजी : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे शुक्रवारी ३० रोजी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. ते उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन बैठका घेऊन मंत्री, आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
नाईक म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ते हे मार्गदर्शन करणार आहेत. नितीन नवीन हे युवा आहेत. देशांमध्ये युवांची संख्या ५० टक्केपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भाजपने युवा अध्यक्ष दिलेला असून युवांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि राजकारणात त्यांचा सहभाग वाढावा यासाठीच भाजपने युवा अध्यक्ष केल्याचे ते म्हणाले.
आपण दिल्लीमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीमध्ये हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील विजयाबद्दल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल आपला विचार व्यक्त केला असल्याचे ते म्हणाले.