BJP campaign file photo
गोवा

Goa BJP | गोव्यात भाजपचे मिशन 30 प्लस! सहा मतदारसंघ जिंकण्यासाठी पक्षाने आखली रणनीती

Goa BJP | भाजपकडे सध्याच्या घडीला ४० पैकी २६ आमदार आहेत. भाजपच्या दोन आमदारांचे निधन झाले असल्यामुळे फोंडा आणि ताळगाव या जागा रिक्त आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

भाजपकडे सध्याच्या घडीला ४० पैकी २६ आमदार आहेत. भाजपच्या दोन आमदारांचे निधन झाले असल्यामुळे फोंडा आणि ताळगाव या जागा रिक्त आहेत. या २८ जागांसह यापूर्वी भाजपने जिंकलेले, मात्र सध्या विरोधी पक्षाकडे असलेले फातोर्डा, कुंकळ्ळी, हळदोणा, सांत आंद्रे व मांद्रे या पाच मतदारसंघांसह केपे मतदारसंघ जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे आणि त्या दिशेने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी नियोजनही सुरू केलेले आहे, अशी माहिती प्रदेश भाजपच्या नेत्याने दिली.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिव प्रकाश यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते तसेच गोवा भाजप प्रभारी भारती पवार, उपप्रभारी अनिल अँटोनी हे नेते सातत्याने गोव्यात दाखल होत असून अटल भवन या भाजप मुख्यालयात भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते व आमदार-मंत्र्यांना मार्गदर्शन करत आहेत. वरील सहा मतदारसंघ जिंकून ३० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.

सध्याच्या घडीला नुवे मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आलेक्स सिक्वेरा हे भाजप आमदार असले तरी तेथे भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकता येत नसल्याची जाणीव भाजपला असल्याने पक्षाने तो मतदारसंघ जमेस धरलेला नाही, असेही भाजप नेत्याने सांगितले.

फातोर्डात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी २००२ आणि २००७ साली जिंकला होता. त्यानंतरच्या पुढील तीन निवडणुकांमध्ये दामू यांना सरदेसाई यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. आता दामू हे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांना फातोर्डा पुन्हा जिंकावाच लागणार आहे. २०२२ मध्ये विजय सरदेसाई यांना ११,०६३ तर दामू नाईक यांना ९,५३६ मते मिळाली होती. सरदेसाई अवघ्या १,५२७ मतांच्या फरकाने जिंकले होते.

सासष्टीतील कुंकळ्ळी मतदारसंघ भाजपने २०१२ मध्ये जिंकला होता. भाजपचे उमेदवार सुभाष ऊर्फ राजन नाईक यांना त्यावेळी ७,७३८ मते मिळाली होती. ते १,३१३ मतांनी जिंकले होते. २०१७ मध्ये त्यांचा पराभव काँग्रेस उमेदवार क्लाफासियो डायस यांनी केला. त्यानंतर डायस हे अन्य ९ आमदारांसह भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे २०२२ च्या निवडणुकीत डायस यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, युरी आलेमाव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

आलेमाव यांना ९,८६६ तर डायस यांना ६,६३२ मते मिळाली होती. यावेळी तेथे भाजपचे नेते विशाल देसाई हे लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी येथे अपक्ष लढण्याची घोषणा केली असल्यामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी झाल्यास भाजपच्या उमेदवाराला विजयाची संधी मिळू शकते, असे भाजपचे मत आहे.

हळदोणा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ग्लेन टिकलो हे २०१२ व २०१७ साली जिंकले होते. मात्र २०२२ च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे उमेदवार अॅड. कार्लुस फेरेरा यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेला आहे. २०२२ च्या निवडणुकीत किरण कांदोळकर हे भाजपचे माजी आमदार तृणमूलच्या उमेदवारीवर उभे राहिल्यामुळे हळदोण्यातील हिंदूंची मते किरण कांदोळकर यांच्याकडे वळली आणि ग्लेन टिकलो यांना पराभव पत्करावा लागला.

अॅड. फेरेरा यांना ९,३२०, टिकलो यांना ७,४९७ व कांदोळकर यांना ३,६४७ मते मिळाली होती. यावेळी कांदोळकर हे थिवीतून अपक्ष लढणार असल्याने टिकलो यांना विजयाची संधी मिळू शकते, असे भाजपला वाटते.

केपे जिंकण्याचे लक्ष्य

केपे मतदारसंघ अद्याप भाजपने जिंकलेला नसला तरी २०२२ साली भाजपचे उमेदवार राहिलेले व चार निवडणुकींत जिंकलेले माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना (११,३९३ मते) पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार एल्टन डिकॉस्टा (१४,९९४ मते) यांनी कवळेकर यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी निश्चितपणे केपेत भाजप जिंकेल व तेथे कमळ फुलेल, असा विश्वास कवळेकरांसह भाजप नेत्यांना वाटतो.

सांत आंद्रेत ७६ मतांनी पराभव

सांत आंद्रे मतदारसंघात २०१२ साली विष्णू वाघ यांनी भाजपच्या उमेदवारीवर विजय संपादन केला होता. त्यानंतर उपसभापती असतानाच त्यांचे निधन झाले. पोटनिवडणुकीत व त्यानंतरच्या २०१७ च्या निवडणुकीत फ्रान्सिस सिल्वेरा यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. त्यानंतर २०१९ मध्ये इतर ९ आमदारांसह सिल्वेरा काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. २०२२ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, आरजी पक्षाचे वीरेश बोरकर यांनी सिल्वेरा यांचा अवघ्या ७६ मतांनी निसटता पराभव केला.

मांद्रेत पुन्हा कमळ फुलवण्याचे लक्ष्य

मांद्रेत २०२२ मध्ये भाजपचे दोन नेते उभे राहिल्याने मगो उमेदवार जीत आरोलकर यांना विजय मिळाला होता. २०१७ मध्ये मुख्यमंत्री असताना निवडणूक हरलेले प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपने उमेदवारी न देता २०१७ मध्ये काँग्रेस उमेदवारीवर जिंकून त्यानंतर भाजपमध्ये आलेले दयानंद सोपटे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे प्रा. पार्सेकर अपक्ष लढले व सोपटेच्या पराभवाला कारण ठरले. या निवडणुकीत आरोलकर (मगो) यांना १०,२४३, दयानंद सोपटे (भाजप) ९,४७७ व प्रा. पार्सेकर (अपक्ष) ५,६२३ मते मिळाली. यावेळी प्रा. पार्सेकर व सोपटे एकत्र आले असल्याने येथे कमळ फुलवण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे.

सांत आंद्रेत 76 मतांनी पराभव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT