गोवा

Goa Assembly Election 2027: पणजीत भाजपकडून पर्रीकर यांच्या मुलाला उमेदवारी? दिल्लीत खलबतं

Goa Assembly Election |काँग्रेसतर्फे सुरेंद्र फुर्तादो, तर आपतर्फे वाल्मीकी नाईक रिंगणात उतरण्याच्या तयारीत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे

पारवाडकर गोवा विधानसभा निवडणुकीला अवघे आठ महिने शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच ४० ही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची चाचपणी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे एका आठवड्यात दोन वेळा दिल्लीला जाऊन आल्याने भाजपच्या उमेदवारीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याचे कळते. या चर्चेत पणजी विधानसभा भाजप उमेदवारीसाठी पणजीचे आमदार व महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या सोबतच माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व उत्पल पर्रीकर यांच्या नावाची चर्चा झाल्याचे कळते.

दुसरीकडे पणजीत काँग्रेसतर्फे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, आपतर्फे पक्षाचे गोवा संयेजक वाल्मिकी नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राज्यातील ४० मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांबाबत दिल्लीत चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेमध्ये पणजी विधानसभा मतदारसंघासाठी वरील तीन नेत्यांच्या नावांची चर्चा झाली. बाबूश मोन्सेरात हे विद्यमान आमदार व मंत्री असतानाही कुंकळयेकर व पर्रीकर यांच्या नावाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे ताळगाव मतदारसंघाच्या आमदार व बाबूश यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात या आजारी असल्यामुळे येणारी निवडणूक त्या लढवणार नाहीत.

त्यामुळे मंत्बी रबूश मोन्सेरात यांना भाजपकडून ताळगाव मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पणजीतील भाजप उमेदवारीसाठी माजी आमदार कुंकळ्येकर व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याचा विचार सध्या भाजपश्रेष्ठी करत आहेत. दुसरीकडे बाबूश मोन्सेरात यांनी ताळगाव मध्ये आपले पुत्र व पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांना उभे करण्याची तयारी सुरू केली असून आपण आणखी एक वेळ पणजीतून लढणार असल्याचे ते कार्यकर्त्यांना सांगत आहेत. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्य समिती नेमकी उमेदवारी कुणाला देतात, हे पाहावे लागेल.

सिध्दार्थही उमेदवारीच्या शर्यतीत सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पणजीतून दोन वेळा निवडून आले. मात्र, दोन्ही वेळा त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कारण दोन्ही वेळा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी त्यांनी जागा रिक्त केली होती. पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

त्यानंतर मोन्सेरात हे भाजपात आल्याने २०२२ च्या निवडणुकीत त्यांना दूर राहावे लागले होते. सध्याच्या घडीला सिद्धार्थ कुंकळ्येकर हे भाजप संघटनेमध्ये सक्रिय आहेत. प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणून ते काम पाहतात. मोन्सेरात यांना ताळगावला भाजपने पाठवले, तर उत्पल पर्रीकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर यातील एकाची निवड करणे भाजपसाठी बरेच कठीण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून सुरेंद्र फुर्तादो की नवा चेहरा ? पणजीत काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी आहे. तरिही काँग्रेसची पारंपरिक मते मोठ्या प्रमाणात पणजीत आहेत.

माजी महापौर व काँग्रेसचे नेते सुरेंद्र फुर्तादो यांनी २०२७ विधानसभा निवडणूक आपण काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेंद्र फुर्तादो हे सध्या काँग्रेस मध्ये तितकेसे सक्रिय नाह असले तरी काँग्रेसकडे अन उमेदवार दिसत नाही. २०२ एल्विस गोम्स यांनी क निवडणूक लढवली होती. ३,१७५ मते मिळाली होती. काँग्रेसतर्फे फुर्तादो यांना मिळणार की नवा चेहरा नि रिंगणात उतरवणार हे पाहावे काँग्रेस उमेदवारीसाठी प्रदे गिरीश चोडणकर कोणती घेतात, याकडे लक्ष लागून राहिल

उत्पल पर्रीकर यांचा विचार होणार का?

२०२२ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्याने उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि त्यांनी बाबूश मोन्सेरात यांना चांगलीच लढत दिली होती. मोन्सेरात यांना ६,७८७ मते, तर पर्रीकर यांना ६,०७१ मते मिळाली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पणजी महापालिकेच्या निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांनी आपले आम्ही पणजीकर हे पॅनल उभे केले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे उमेदवार निवडणुकीला अवघे आठ दिवस बाकी असताना ठरले होते. त्यांना प्रचाराला वेळ मिळाला नाही तरी नवख्या उमेदवारांनी बाबूश मोन्सेरात यांच्या अनेक वर्षे नगरसेवक असलेल्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे पणजीत उत्पल यांना पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. त्यांना भाजपची उमेदवारी मिळली तर ते निश्चितपणे निवडून येतील, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT