बेतोडा : येथील पत्रकार परिषदेवेळी उपस्थित ग्रामस्थ.  
गोवा

Goa |बेतोड्यातील बेकायदा भूखंड प्रकरणाविरोधात ग्रामस्थ एकवटले

बेतोड्यातील बेकायदा भूखंड प्रकरणाविरोधात ग्रामस्थ एकवटले

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : बेतोडा परिसरात बेकायदा भूखंड पाडून विक्री करण्याच्या प्रकाराविरोधात ग्रामस्थ आता एकवटले असून, हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पाडलवाडा-बेतोडा येथील बेकायदा भूखंड तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या प्रक्रियेत सहभागी सर्वांची 'ईडी'मार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या जमीन प्रकरणाला कारणीभूत ठरलेल्या नगर नियोजन खाते, निबंधक कार्यालय, तसेच मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यावेळी ज्ञानेश्वर खांडेपारकर, उच्चारी गावडे, देविदास गावकर, देवेंद्र च्यारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उच्चारी गावडे यांनी एसआयटीकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणातील मध्यस्थ फेर्दीन शेख याला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपी महंमद जावेद मुल्ला आणि निरज काणकोणकर यांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असून, पुढील सुनावणी येत्या ६ तारखेला होणार आहे. ही कारवाई सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

न्यायालयाने हस्तक्षेप करावा

राज्यात जमिनी बळकावून त्या बाहेरील लोकांना विकण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत, बेतोड्यातही अशाच बेकायदा विक्रीचा प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हे प्रकार रोखण्यासाठी न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT