गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर पत्रकार परिषदेत बोलताना  Pudhari
गोवा

Goa Assembly Silver Jubilee | गोवा विधानसभा संकुलाचा ६ ऑक्टोबरपासून रौप्यमहोत्सव

आजी-माजी आमदारांचा होणार गौरव; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला प्रमुख पाहुणे

पुढारी वृत्तसेवा

Goa Legislative Assembly Complex

पणजी : गोवा विधानसभा संकुल, पर्वरीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसीय सोहळ्यात आजी-माजी आमदारांचा गौरव करण्याबरोबरच विधानसभा संकुलाचा सचित्र इतिहास छायाचित्र प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे. रौप्यमहोत्सवाचे उद्घाटन ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा परिसरात होणार आहे.

गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांनी गुरुवारी (दि.१) पर्वरी विधानसभा कक्षात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विधानसभा सचिव नम्रता उल्मन आणि सहसचिव अ‍ॅड. मोहन गावकर उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधिमंडळ कामकाज मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह मंत्री व आमदारांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात गार्ड ऑफ ऑनर, वंदे मातरम्‌, राष्ट्रगीत आणि पारंपरिक दीपप्रज्वलनाने होईल.

यावेळी विधानसभा इमारतीवरील विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हरचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच स्मरणिका आणि कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन होणार आहे. विविध राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

विधानसभा इमारतीच्या मागील भागात मंडप उभारून कार्यक्रम होणार असून चारही दिवस नागरिकांसाठी सोहळा खुला राहणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक असेल. समारोप सोहळ्यास केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

पेपरलेस कामकाजाचा उपक्रम सुरूच

राजेंद्र आर्लेकर सभापती असताना गोवा विधानसभेत पेपरलेस कामकाजाचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. हा उपक्रम आपणही पुढे सुरू ठेवला असून, त्यामुळे कागदाची बचत होऊन लाखो झाडे वाचण्यास मदत झाली, असे डॉ. गावकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT