Goa  
गोवा

Goa - हडफडेतील २१ आस्थापनांना सील

बेकायदेशीर विस्तार केल्याने पंचायतीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी: हडफडे - नागोआ पंचायत परिस-रातील २५ बेकायदेशीर आस्थापनांना कारणेदाखवा नोटीस बजावून सील करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेले व्यावसायिक विस्तार तपासणीत उघडकीस आले आहेत. गोवा खंडपीठानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेथ कारवाईचे निर्देश पंचायतीला दिले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, तपासणीत अनेक रेस्टॉरंट्स, रॉक्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनी परवानगीपेक्षा अधिक बांधकाम केल्याचे आढळले. काही ठिकाणी पार्किंग, स्टोरेज आणि अतिरिक्त खोल्यांसाठी अनधिकृत विस्तार करण्यात आला होता.

या सर्व बांधकामांवर नियमांचे उल्लंघन झाल्याने कारवाई करण्यात आली. संबंधितांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; मात्र समा धानकारक प्रतिसाद न मिळाल्याने सील करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यावसायिक उपक्रमांवर आळा बसणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे. तसेच पुढील काळात अशा प्रकारच्या उल्लंघ नांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, स्थानिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, अनधिकृत बांधका मांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक, प्रदूषण आणि सुरक्षिततेच्या समस्यां बाबत प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

फिश अॅक्वेरियम आस्थापनाला तात्पुरता दिलासा

हडफडे पंचायतीने सील केलेल्यांपैकी एक आस्थापन फिश अ क्वेस्थिमचे आहे. सुमारे ४० फिश टैंक व दहा हजार शोभेचे मासे आहेत. त्याच्या पालनपोषणसाठी गुरुवारी (२२ एप्रिल) व शनिवारी (२ मे) खुले करण्याचे निर्देश उच्च्च न्यायालयाने देऊन याचिकेवरील सुनावणी सोमवारी (४ मे) ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT