Arrested Pudhari
गोवा

Goa Anti Narcotics Cell | पणजीत 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

Goa Anti Narcotics Cell | अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) पणजी सर्कल परिसरात कारवाई करून १५ लाख रुपये किमतीचा १४.९५३ किलो गांजा जप्त केला असून, भागीरथ सिंग (३१) आणि प्रशांत सिंग (२७) या दोन संशयितांना अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) पणजी सर्कल परिसरात कारवाई करून १५ लाख रुपये किमतीचा १४.९५३ किलो गांजा जप्त केला असून, भागीरथ सिंग (३१) आणि प्रशांत सिंग (२७) या दोन संशयितांना अटक केली आहे.

अटकेनंतर दोन्ही संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी बिहार येथील अखिलेश गुप्ता हा गांजाचा मुख्य पुरवठादार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, अखिलेश गुप्ता सध्या फरार असून त्याचा शोध एएनसीकडून सुरू आहे. या प्रकरणी अमली पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास एएनसी करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT