पणजी : शेअर्समधील उच्च परताव्याचे आमिष दाखवून 4.74 कोटी रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी सूरज एकनाथ सावंत (रा. म्हासुर्ली, कोल्हापूर, महाराष्ट्र) याला सायबर विभागाच्या पथकाने अटक केली.त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणात एकूण तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयित आरोपीचा सहकारी आविष्कार देविदास सुरडकर (रा. गायरानवाडी, मांडुरा, जालना , महाराष्ट्र) याला याआधी अटक करण्यात आली असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तिसरी संशयित आरोपी मालती राकेश शर्मा (रा. अंजना नगर, बंगळुरू) असून तिच्या बँक खात्यात 30 लाख रुपये जमा झाले होते आणि तिने ते इतर खात्यात पाठवले होते.