Goa Mall 
गोवा

24x7 Goa Mall Timing | गोव्यात दुकाने-मॉल्स 24 तास खुले राहणार; आठवड्याचे सातही दिवस व्यवसायाची मुभा

24x7 Goa Mall Timing | मंत्री बाबुश मोन्सेरात : परवानगी मुदतपूर्व रद्द न केल्यास तीन वर्षांसाठी वैध

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील दुकाने व मॉल्सना आठवड्यातील सर्व दिवस २४ तास खुले ठेवण्याची परवानगी केंद्राच्या निर्देशानुसार देण्यात आली आहे, अशी माहिती कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिली आहे.

राज्यातील दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्सना २४ तास चालवण्याची परवानगी दिली आहे. तशी अधिसूचना सरकारने काढली आहे. १६ नोव्हेंबरपासून तत्काळ लागू झालेला हा आदेश 'गोवा दुकाने आणि आस्थापना (रोजगार आणि सेवा शर्तींचे नियमन) अधिनियम, २०२५' (गोवा अधिनियम २३, २०२५) अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व व्यावसायिक आस्थापनांना लागू होतो.

या कायद्यामुळे राज्याला जनहितार्थ उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेचे नियमन करण्याचे अधिकार मिळतात. ही परवानगी मुदतपूर्व रद्द न केल्यास तीन वर्षांसाठी वैध राहील. मोन्सेरात यांनी सांगितले की, केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी गोवा कामगार खात्याला पाठवलेल्या पत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने सेवा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये टप्प्याटप्प्याने चोवीस तास कामकाज सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT