Girish Chodankar Goa 
गोवा

Girish Chodankar | बॅनर फाडून गोव्याचा आवाज दाबतात येणार नाही

Girish Chodankar | चर्चा करण्यास पुढे येण्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पोस्टर फाडून गोव्याच्या जनतेचा आवाज दाबतात येणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. दरम्यान, काँग्रेसच्या 'गोवा राखण यात्रे'चे पोस्टर आणि प्रचार साहित्य फाडण्यात आल्याच्या प्रकारावर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पोस्टर फाडून गोव्याच्या जनतेचा आवाज दाबतात येणार नाही.

भाजपने गोवा राखण यात्रेचे पोस्टर फाडण्याऐवजी जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यास पुढे यावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपला दिले.
चोडणकर म्हणाले की, पोस्टर फाडता येतील; पण गोमंतकीयांच्या आकांक्षा फाडता येणार नाहीत. जनतेचा आवाज कात्रीने किंवा सुरीने कापता येत नाही.

विविध प्रश्नांची जनतेला उत्तरे द्या

पोस्टर आणि बॅनर लक्ष्य करण्याऐवजी भाजपने गोव्यातील रोजगार, जमिनींचे संरक्षण, विकास, ड्रगचा प्रश्न, वाढती महागाई आणि गोव्याची अस्मिता व साधनसंपत्तीचे संरक्षण यासारख्या प्रश्नांवर जनतेला उत्तरे द्यावीत, असेही चोडणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT