गोवा

Giants Wheel banned at Damodar Bhajani Saptah - दामोदर भजनी सप्ताहात जायंट्स व्हीलवर बंदी

दामोदर भजनी सप्ताहात जायंट्स व्हीलवर बंदी, जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स, अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांच्याकडून वास्कोत पाहणी

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी :येत्या १८ ऑगस्ट रोजी वास्कोत साजरा होणारा श्री दामोदर भजनी सप्ताहाची पूर्व तयारीची पाहणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इझना क्लेट्स यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरासह सप्ताहात फेरीत भरणाऱ्या जागेची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी क्लिट्स यांनी सांगितले की, यंदा सप्ताहात मुरगाव घालण्यात येणारा 'जायट्स व्हील'वर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांनी कायदा सुव्यवस्थेची पाहणी करून अतिरिक्त पोलिस दल सप्ताहात तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वास्को येथे १७, १८, १९ रोजी साजरा करण्यात येणाऱ्या श्री दामोदर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले की, सप्ताहात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना योग्यप्रकारे श्री देव दामोदाचे दर्शन व्हावे म्हणून पोलिस व समितीचे पदाधिकारी जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून अतिरिक्त पोलिस येणार असल्याचे साळकर यांनी सांगितले. सप्ताहात येणाऱ्या वाहनांना पार्किंग व्यवस्था पूर्वीचे मासळी मार्केटमधील जागा व एचपीसीएलमधील खुल्या जागेत करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक एलविटो रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

भजनी सप्ताहाची कायदा सुव्यवस्थेची पाहणी गुरुवार (दि.१३) रोजी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंह वर्मा, मुरगावचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, मुरगावचे मामलेदार प्रविणजय पंडित, मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, वास्को पोलिस निरीक्षक वैभव नाईक, वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक एलविटो रॉड्रिग्ज, मुरगाव पालिका निरीक्षक योगेश देसाई, निरीक्षक सचिन पडवळ, सध्या परब, सेनेटरी निरीक्षक महेश कुडाळकर, श्री दामोदर भजनी सप्ताह बाजारकार व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी, उत्सव समितीचे सरचिटणीस सुरेश नाईक, खजिनदार प्रकाश गावस, माजी अध्यक्ष संतोष खोर्जुवेकर, नरेंद्र गुरव, अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप बिचोलकर व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.

योग्य ती खबरदारी घेणार: पोलिस अधीक्षक वर्मा

श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या फेरीत खाद्यपदार्थ बनविण्यासाठी एकच ठिकाण उपलब्ध करून देण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इसा क्लिट्स यांनी मुरगाव पालिकेला दिले आहे. तसेच सप्ताहात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन घेताना कोणताही त्रास होता नये असे त्यांनी सप्ताह समितीला व पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी क्लिट्स यांनी यंदा सप्ताहात 'जायट्स व्हील' वर पूर्णपणे बंदी घातल्याचे सांगितले. आम्हाला सप्ताहात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंह वर्मा ही खबरदारी घेणार असल्याचे क्लिट्स यांनी सांगितले.

अतिरिक्त पोलिस तैनात ठेवणार : आमदार साळकर

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले की, सप्ताहात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना योग्यप्रकारे श्री देव दामोदाचे दर्शन व्हावे म्हणून पोलिस व समितीचे पदाधिकारी जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून अतिरिक्त पोलिस येणार असल्याचे साळकर यांनी सांगितले. सप्ताहात येणाऱ्या वाहनांना पार्किंग व्यवस्था पूर्वीचे मासळी मार्केटमधील जागा व एचपीसीएलमधील खुल्या जागेत करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक एलविटो रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT