supreme court pudhari photo
गोवा

Gauri Achari Murder Case | गौरव बिद्रेचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

पणजी : खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापिका गौरी आचारी हिच्या खूनप्रकरणी संशयित गौरव बिद्रे याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. हे प्रकरण गंभीर असल्याची दखल घेत त्याला जामीन देणे योग्य होणार नाही, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे जामीन मिळण्याची त्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत.

४ वर्षांपूर्वी गौरी आचार्य हिचा एकतर्फी प्रेमातून गौरव बिद्रे याने गळा आवळून खून करून मृतदेह कदंब पठारावर निर्जनस्थळी फेकून दिल्याचा त्याच्यावर आरोप होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर त्याने अनेकदा सत्र तसेच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, दोन्ही न्यायालयाने गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेत ते फेटाळले होते.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, सध्या चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपीला जामीन देणे योग्य ठरणार नाही. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू असून, पुढील टप्प्यात महत्त्वपूर्ण साक्षी आणि पुरावे नोंदवले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT