Prisoner Pudhari File Photo
गोवा

Goa |विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी माजी शिक्षकाला ११ वर्षांची सक्तमजुरी

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी माजी शिक्षकाला ११ वर्षांची सक्तमजुरी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पणजी येथील जलदगती विशेष न्यायालयाने ११ वर्षांची सक्तमजुरी व ८५ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीने आपल्या शिक्षकी पेशाचा गैरवापर करून विद्यार्थिनीला आपल्या घरी बोलावून अत्याचार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने हा निवाडा देताना केले आहे.

पीडित मुलगी दहावीची विद्यार्थीनी असताना आरोपीने अतिरिक्त वर्गाच्या नावाखाली तिला धमकावून बोलावले आणि एकांतात अत्याचार केला. तसेच तिची छायाचित्रे व व्हिडिओ काढून तिला तो ब्लॅकमेल करत राहिला. त्यामुळे भीतीने तिने याला वाचा फोडली नाही. आरोपीने २०१५ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत अत्याचार सरू ठेवले असे पोलिस

तपासात काही पुरावे व साक्षीदारांच्या जबानीनुसार निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. हा तपास पेडणेचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी यांनी केला होता. बचाव पक्षाने प्रकरण बनावट असल्याचा दावा करत तक्रारीतील पाच वर्षांच्या उशिराचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT